लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मानवी जीवनात अन्न, वस्त्र व निवारा या गरजेसोबतच संस्कार व शिक्षणालाही महत्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरिता शिकवणी वर्गाचे सर्वत्र जाळे तयार करून बाजारीकरण सुरु झाल्याने शेतकरी, कष्टकरी सामान्य जनता प्रभावित झाली आहेत. मुल कितीही हुशार असली तरी त्यांच्या बुद्धीमत्तेला चकाकी मिळण्यासाठी पैशांचा अडसर निर्माण झाला आहे. तो अडसर दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने करीत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले आहे.येथील मातोश्री सभागृहात आयोजित नि:शुल्क करिअर मार्गदर्शन व कोचिंग क्लासेसच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, सिने अभिनेता विवेक फुसे, किशोर हुड, प्रदीप जायस्वाल, नगरसेवक सुनिल पारधी, सचिन बोपचे, कैलाश पडोळे, दिपक बालपांडे, विष्णू आहुजा, विक्रम लांजेवार, आशिष पडोळे, किरण जोशी, तारा गभणे, वर्षा लांजेवार, मनमोहन पंचोली मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रदीप पडोळे यांनी, शिक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठी जो तो धडपडत असताना अभियांत्रीकी व वैद्यकीय सारख्या क्षेत्राची आवड करून करिअर बनविण्याचा विचार करतात. परंतु त्यासाठी जे ईई, निट, एमएचटी, सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. परंतु त्यासाठी लागणारा सर्व पाहता अनेक हुशार मुले याक्षेत्रापासून वंचित राहतात. आता यापुढे त्यांना वंचित राहू न देता तुमसरच्या गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांकरिता नि:शुल्क कोचिंग क्लासेस नगरपरिषद तुमसर, गोंडवाना आदिवासी विकास बहुउद्देशिय शिक्षण संस्था व एडीआर ग्रृप आॅफ इन्स्टीट्युशनच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आले असून विद्यार्थी व पालकांनी संधीचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार राहुल डोंगरे यांनी केले.
बुद्धीमतेच्या चकाकीसाठी पैशांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:36 AM
मानवी जीवनात अन्न, वस्त्र व निवारा या गरजेसोबतच संस्कार व शिक्षणालाही महत्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरिता शिकवणी वर्गाचे सर्वत्र जाळे तयार करून बाजारीकरण सुरु झाल्याने शेतकरी,
ठळक मुद्देप्रदीप पडोळे : नि:शुल्क करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन