दिघोरी मोठी : रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियमांचे पालन अंतर्गत पोलिसांनी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. यात विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक गावंडे, पोलीस उपनिरीक्षक गोबाडे, वाहतूक पोलीस नाईक सतीश पुराम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली. तसेच १८ वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे वाहन चालवू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रामटेके व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी मोठी येथे ऑटोचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पुस्तोडे डॉ. समरीत यांच्याकडून सहकार्य लाभले.
दिघोरीत रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:38 AM