शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आरोग्य आणि करिअरवर ‘डिजिटल संवाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:25 AM

युवक बिरादरीचे (भारत) संस्थापक अध्यक्ष पद्मश्री क्रांती शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत या डिजिटल संवाद उपक्रमाच्या पहिल्या भागाचे उद्‌घाटन झाले ...

युवक बिरादरीचे (भारत) संस्थापक अध्यक्ष पद्मश्री क्रांती शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत या डिजिटल संवाद उपक्रमाच्या पहिल्या भागाचे उद्‌घाटन झाले तर दुसऱ्या भागाच्या उद्‌घाटनाला कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिल्लारी उपस्थित होते. पहिल्या भागात आरोग्यविषयक मुलाखतीत भंडारा जिल्हा कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि सर्जन डॉ. नितीन तुरस्कर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनोज आगलावे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दीपक नवखरे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. प्रमोद धुर्वे, फिजिओथेरेपिस्ट डॉ. प्रीती चोले, सामान्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत निंबार्ते, बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन देशपांडे, दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉ. पंकज गिरेपुंजे सहभागी झाले होते. दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना, युवकांना ‘करियरच्या वेगवेगळ्या वाटा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पहिल्या सत्रात ‘यूपीएससी: संधी, तयारी आणि अडचणी’ या विषयावर केंद्रीय वस्तू व सेवाकर आणि सीमाशुल्क, पुणे विभागाच्या संयुक्त आयुक्त उषा भोयर-दोनोडे यांनी मार्गदर्शन केले. सनदी लेखापाल म्हणून करिअर कसं करावं यावर प्रसिद्ध सनदी लेखापाल पंकज मुंधडा यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ‘करियर कसं निवडावं’ यावर करियर तज्ज्ञ आशुतोष शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले. ‘पत्रकारिता क्षेत्रातील करियर’ यासंदर्भात एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील निवेदक सौरभ कोरटकर यांनी तरुणांशी संवाद साधला तर, समुद्रात कुठल्या कुठल्या प्रकारच्या नोकरी करता येऊ शकतात, यावर ओएनजीसीमध्ये कार्यरत वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक विनायक ढेंगे यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय सत्राला युवक बिरादरीचे (भारत) संस्थापक पद्मश्री क्रांती शहा, भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, युवक बिरादरीचे डायरेक्टर जनरल सुनील वालावलकर, व्हाईस चेअरपर्सन आशुतोष शिर्के, मॅनेजिंग ट्रस्टी स्वर क्रांती आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन प्रशांत वाघाये यांनी केले.

हा संपूर्ण कार्यक्रम भंडारा युवक बिरादरी आणि स्वप्नपूर्ती फाऊंडेशनच्या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. कार्यक्रमाला भंडारा युवक बिरादरीचे अध्यक्ष पंकज इंगोले, संस्थापक संचालक वर्षा दाढी, स्वप्नपूर्ती फाऊंडेशनचे मार्गदर्शक धीरज पाटील, सचिव सुधीर काळे, उपाध्यक्ष प्राची बेदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी युवक बिरादरीचे सुरेंद्र कुलरकर, विक्रम फडके, वैभव कोलते, सोनाली दाढी, अश्‍विनी शंभरकर, राधेश्याम बांगडकर, विशाल जाखमाते, हर्षल डहारे, दीपक तिघरे, स्वप्नपूर्ती फाऊंडेशनचे किशोर वाघाये, अतुल भांडारकर, संजय वनवे, अंगेश बेहलपांडे, मीनाक्षी सिंगनजुडे, भारती वाघाये, स्वीटी बोटकवार, याह्या आकबानी, नीलेश राऊत, आशिष राऊत, विशाल हटवार, सुधन्वा चेटुले, माया बोरकर, लक्ष्मण बावनकुळे, नीतेश टिचकुले, अनिकेत नगरकर, भीष्मा लांडगे, प्रज्वल निंबार्ते, विशाल नंदपुरे यांनी सहकार्य केले.