शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

लोक सहभागातून शाळा झाली डिजिटल

By admin | Published: March 29, 2017 12:45 AM

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळा सक्षम व्हावी ....

माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : प्रेरणा सभेतून मिळाली उर्जामानेगाव (बाजार) : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळा सक्षम व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव बाजार या शाळेतून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम वासीयांनी शाळा डिजिटल करून चांगला उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या डिजिटल शाळा करण्याच्या चळवळीत येथील माजी विद्यार्थ्यांच्या वनश्री परिवार यांच्या वतीने एक एलसीडी प्रोजेक्टर व ध्वनी संच भेट देवून डिजीटल क्लॉस रूमची निर्मिती करण्यात आलेली आहे. शाळेला भौतिक सुविधा रंगरंगोटी करून भिंती बोलक्या व विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शैक्षणिक वातावरण कसे निर्माण करता येईल यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने पालक व ग्रामवासी यांची प्रेरणा सभा घेण्यात आली. या सभेला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पी.पी. झोडे, सेलोटी (ता.लाखनी) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्य पे्ररणासभेून उर्जा घेवून येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सरपंच ग्रामपचांयत मानेगाव, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील, पालक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामवासीयांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून शाळा डिजिटल व्हावी, यासाठी गावातून निधी संकलित करण्यात आला. मिळालेल्या रक्कमेतून एक वर्ग खोली डिजिटल करण्यात आली आहे.तसेच येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून एक वर्ग खोलीच्या शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी लागणारा खर्च उचललेला आहे. १०० टक्के शाळा डिजीटल करण्यासाठी शाळेचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी पालकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. यातून विद्यार्थ्यांना मात्र चांगले शिक्षण मिळावे ही ग्रामवासीयांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)