अशोक पारधी पवनी बाजार चौकाजवळ नगर परिषद लाल बहादूर प्राथमिक शाळेसमोर जिर्णावस्थेत उभी असलेली नगर पालिका विद्यालयाची जीर्ण इमारत धोकादायक ठरत आहे. संततधार पावसात ही इमारत कोसळण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. इमारत नाहीसी करून बाजार चौकातील लगतच्या व्यावसायीकांचा धोका टाळावा.पालिका विद्यालयाच्या जून्या इमारतीमध्ये सुरूवातीला इयत्ता ५ ते ७ वी चे वर्ग भरत होते. पाण्याच्या टाकीकडे नवीन इमारत झाल्याने शाळेचे वर्ग स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतर तालुका स्तरावर न्यायालय मंजूर झाल्याने न्यायालयाची इमारत होईपर्यंत त्या इमारतीमध्ये न्यायालय सुरू राहिले. न्यायालय सुद्धा नवीन इमारत स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतर त्याचठिकाणी डॉ. येळणे यांनी लॉ कॉलेज सुरू केले. त्यांनीही स्वत:ची इमारत तयार केली. गेल्या दोन तीन वर्षापासून इमारत पडीत आहे. इमारतीचे कौलारू छप्पर उधवस्त झालेले आहे इमारत पडीत असल्याने साप, मुंगूस, घुस व विंचू त्याठिकाणी निवास करून राहत आहेत. त्या सर्वांचा त्रास इमारतीचे पाठीमागे व बाजूला दुकान थाटून बसलेल्या व्यावसायीकांना होत आहे. तसेच इमारत जिर्णावस्थेत व निरूपयोगी असल्याने संततधार पावसात पतझड झाल्यास धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनी इमारत पाडून बाजार चौकासाठी जागा मोकळी करण्यात यावी.
पालिका विद्यालयाची जीर्ण इमारत धोकादायक
By admin | Published: July 10, 2016 12:16 AM