ठळक मुद्देधानाची तंत्रशुद्ध शेती : पालांदूर येथे शेती हायटेक, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
<p>मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : आधुनिक शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्याचे धाडस पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गावातील शेतकरी करीत आहेत. जपानी पध्दतीची रोवणी करीत पट्टा पद्धतीचा आधार घेत लक्षवेधी रोवणीने पालांदूर परिसरातील शेतकरी जिल्ह्यात चर्चिल्या जात आहे.पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी स्वीकारीत धानाच्या शेतीत आमुलाग्र बदल स्वीकारला आहे. पºहे पेरणीपूर्वी मशागत, नर्सरीची पद्धत, धानाचे नवीन वाण, संकरीत वाण, हवामानाचा अंदाज, खताच्या मात्रा, किटकनाशकांचा यथोचित वापर, सरकारचे धोरण आदी घटकांचा अभ्यास करून शेती कसण्याचा नवा पायंडा पालांदूर परिसरात रूजू झाला आहे. विशेष बाब म्हणजे अर्ध्यावरच शेतकऱ्यांनी संकरीत वाण निवडीत अधिक उत्पन्नाच्या जाती निवडल्या. शासनाचे धोरण नजरेसमोर ठेवून ठोकळ वाण निवडत शासनाच्या वाढीव दराचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुपर फाईन धानाला अपेक्षित भाव नसल्याने व खासगीत तांदुळ विकत नसल्याने ठोकळ वाणच उपयोगाचा म्हणत जिल्ह्यात सर्वाधिक संकरीत वाण पालांदुरात विकल्या गेल्याचे नामांकित कंपन्यांच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.रोवणी संपल्यागत असून आरंभीच्या रोवणीला डवरण देणे सुरु झाले आहे. प्रगत शेतकरी गोकुळ राऊत, स्वप्नील नंदनवार, क्रिष्णा पराते, भारती नंदुरकर, सुखदास मेश्राम, प्रशांत खागर, घनश्याम भेदे आदी शेतकरी नव्या तंत्रज्ञानात शेती कसत आहेत. ढगाळ हवामानामुळे किडीचा प्रादुर्भावाचा अंदाज घेत फवारणी आरंभली आहे. खताच्या नत्राची मात्रा तीन टप्प्यात विभागून देत आहेत. एनपीके च्या सोबतीने पुरक अन्नद्रव्ये, दाणेदार किटकनाशक, सिंगल सुपरफास्फेट, पोटॅश, सल्फर, जैविक खते आदी विविध भागाचा अभ्यास करून किमान महिनाभर अधिक पाणी न ठेवता फुटवे येण्याच्या अवस्थेत खताच्या मात्रा योग्य प्रमाणात दिल्या जात आहेत.इतरांना हेवा वाटावा असा चुलबंदचा खोरा प्रगतीकडे झेपावत आहे. व्हॉट्सअॅपच्या आधाराने किडीचा फोटो घेत निश्चित फवारणीचे सूत्र शेतकरी अधिकाºयांकडून मागवितत आहेत. कृषी केंद्रातूनही उत्तम दर्जाची खते, किटकनाशके पुरविली जात आहेत.उत्तम सेवेकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या लक्ष पुरवित आहेत. २१ दिवसाच्या धानाला कोनकुबाई बागडे यांच्या शेतात डवरण सुरु आहे. उद्या येणाऱ्या किडीचा अंदाज बांधत फवारणी काहींनी आरंभली आहे. तुडतुडा व करपा प्रतिबंधक ढोकळ वाणाची जात अराईत ८४३३ डी.टी. ही प्रायोगिक तत्वावर काही शेतात लागवड केली आहे.आधुनिक शेतीकरिता कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.जी.आर. शामकुवर, उपविभागीय कृषी अधिकारी पी.पी. गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके, कृषी सहाय्यक शिल्पा खंडाईत, श्रीकांत सपाटे, चुळाराम नंदनवार, भगीरथ सपाटे, विभा शिवणकर, टिचकुले, बुरडे, नगरकर, निर्वाण यांच्या सोबतीला पदवीधर कृषीमित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर हे शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. मात्र यावर्षी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनाने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.अन्नदाता हा देशाचा आधार असल्याने आम्हाकडे असलेले कृषीज्ञान / अभ्यास शेतकºयांना पुरवितो. त्यांच्या विश्वासातच देशाचा विकास असल्याने शेतकरी जगविणे प्रत्येकाचे दायीत्व आहे.- प्रशांत जांभुळकर, पदवीधर कृषीमित्रपारंपारिक शेती परवडणारी नसल्याने नवे काही करण्याच्या मनसुब्याला कृषी अधिकाºयांची मिळालेली साथ मला प्रेरणादायी ठरली. यापूर्वी सुद्धा प्रयत्न केला पण अभ्यासक नसल्याने कमी पडलो. या वर्षाला ३ एकरात पट्टा पद्धत स्वीकारीत धान शेतीत नवा बदल स्वीकारला आहे.- देवेंद्र गणेश कठाणे, शेतकरी पाथरी / चौ.कृषी अधिकाऱ्यांचे, शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:33 PM