लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, संसयीत रुग्णांमुळे आपत्तीची स्थिती उद्भवू नये यासाठी जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधीकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी शुक्रवारी आदेश जारी केले आहेत.आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांची इन्सिडेंट कमांडर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांना सनियंत्रक म्हणून घोषीत करण्यात आले. याअनुषंगाने सर्व शासकीय विभागाच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आदेशीत केले आहेत.यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व अधिनस्त अधिकाऱ्यांद्वारे परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करणे, हॉटेल व नातेवाईकांकडे मुक्काम आहे त्यांची माहिती एकत्रित करून जिल्हा रुग्णालय व संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने कोरोनाविषयी जनजागृती करणे, गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याविषयी आयोजकांना अवगत करणे, अधिनस्त कर्मचाºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करून जिल्हा रुग्णालयाशी समन्वय ठेवण्याचे निर्देश आहे.जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाºयांना लघुकृती प्रमाणित कार्यपद्धत तयार करण्याबाबत निर्देश दिले आहे. आरोग्य विभागाने मार्गदर्शक पुस्तकाचे वितरण करावे, स्वतंत्र वैद्यकीय पथक पूर्णवेळ तयार ठेवावे, संशयीत रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी, आवश्यक औषध साठा उपलब्ध करावा, कोरोंटाइन व आयसोलेशन युनिट स्थापन करून स्वतंत्र न्युडल अधिकाºयांची नियुक्ती करावी. तसेच दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यासोबतच नगरपरिषद, नगरपंचायतच्या नगरप्रशासन अधिकारी, सर्व मुख्याधिकारी यांना जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. वॉर्डनिहाय स्वच्छता ठेवण्याची सूचना आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती करण्याबाबत सूचीत केले आहे. स्वतंत्र वैद्यकीय पथक व नोडल आॅफिसरची नियुक्ती करून अंगणवाडी व शाळांमध्ये प्रबोधन करण्याबाबतही निर्देश दिले आहेत. सध्या जिल्ह्यात कुठेही कोरोनाचा संसर्ग झाला नसला तरी शासकीय यंत्रणा मात्र यासाठी सज्ज आहे.औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईऔषध विक्रेत्यांनी जादा दराने मांस व औषधांची विक्री केली. अथवा साठेबाजी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. वेळोवेळी सर्व औषध विक्रेत्यांची तपासणी करावी व त्यांच्यासोबत समन्वय बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.खासगी डॉक्टरांच्या सेवेचे अधिग्रहणया कायद्यांन्वये खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करणे तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये साधनसामृगी अधिग्रहीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस ५१ अन्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.टोल फ्री क्रमांक कार्यान्वितकोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आले आहे. राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाचा ०२०-२६१२७३९४ व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक ०११-२३९७८०४६ या क्रमांकाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 6:00 AM
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांची इन्सिडेंट कमांडर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांना सनियंत्रक म्हणून घोषीत करण्यात आले. याअनुषंगाने सर्व शासकीय विभागाच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आदेशीत केले आहेत.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना