शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर मुंबईत होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 1:06 AM

गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मांडलेल्या समस्यांवर पालकमंत्री डॉ. परिणय फके यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. उपस्थित प्रकल्पग्रस्तांनीही झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले. चर्चेनुसार जुलै महिन्यातच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आमदार बच्चू कडू यांच्या मुख्य उपस्थितीत सभा घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आश्वासन : भंडारात पार पडली प्रकल्पग्रस्तांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मांडलेल्या समस्यांवर पालकमंत्री डॉ. परिणय फके यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. उपस्थित प्रकल्पग्रस्तांनीही झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले.चर्चेनुसार जुलै महिन्यातच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आमदार बच्चू कडू यांच्या मुख्य उपस्थितीत सभा घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट आश्वासन दिले.प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांमध्ये वाढीव कुटुंब म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा २६ फेब्रुवारी २००९ ला मिळाला,त्या तारखेस १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तास किंवा त्याच्या अपत्यास २.९० लक्ष रुपयेचा लाभ देणे, २४५.५० मीटरच्या जलसाठ्याने बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन करणे, स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी कर्जार्ची तरतूद करणे, पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित बाधितांनी लाभ देणे, संपादित शेतीच्या कास्तकारांना प्रकल्पग्रस्ताचा संपूर्ण लाभ देणे संपादित शेतीला वाढीव आर्थिक मोबदला देणे, पुनर्वसित पर्यायी गावठाणात नागरी सुविधा प्राथमिकतेने देणे, प्रकल्पग्रस्तांना घरकुल-अन्नसुरक्षा योजना प्राधान्याने देने, पर्यायी गावठाण न दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना विशेष सानुग्रह अनुदान देऊन पुनर्वसित करणे, उर्वरीत आणि शेती करण्यास पर्याय नाही अशी नवीन शेती कायद्याने संपादित करणे, मासेमारांना मासेमारीचे अधीकार जलाशयात कायमस्वरूपी देने, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुनर्वसन यंत्रणा यांच्या स्तरावरील समस्या लवकर निपटविणे, नाग नदीच्या पाणीप्रदूषनातून गोसीखुर्द जलाशयाची सुटका करन्यासाठी नियोजित योजना तात्काळ कार्यान्वयीत करणे, आदी मागण्यांबाबत योग्य निर्णय घेण्याची कबुलीही पालकमंत्री डॉ.फुके यांनी दिली.पालकमत्र्यांचे आश्वासन लवकर अंमलात यावे अशी मागणीही प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी व सरपंच सहित उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी वर्तविली.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पParinay Fukeपरिणय फुके