डासांच्या उत्पत्तीचा काळ : मुलांना विषाणुजन्य संसर्ग होण्याची भीतीसाकोली : पावसाळ्यात वातावरणात बदल होतो. उन्हाळ्यात कोरडी, गरम हवा जाऊन आर्द्रता वाढते. तापमानात सतत बदल होतो. सलग पाऊस राहिल्यास दिवसेंदिवस स्वच्छ सूर्यप्रकाश येत नाही. ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे चिलटे व माशांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना संसर्ग होण्याची भीती असते. लहान बाळ पटकन काही वस्तू तोंडात टाकते. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.दूषित पाणी व अन्न यामुळे पावसाळ्यात आजार बळावतात. अनेकदा नळालाही दूषित पाणी येते. याचा थेट फटका घरातील मंडळींना बसत असून ते आजारी पडतात. संसर्गाने तो अधिक प्रभावी होत जातो. अशात मुलांच्या वापराची भांडी उकळून निर्जंतुक करून ठेवावी व पाणी उकळून प्यावे. त्यामुळे लहान मुलांना पटकन होणारा संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो. अशुद्ध पाण्यामुळे मुलांना जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड आणि क्वचित कॉलरा यांच्या साथीची लागण होऊ शकते. या आजारांकडे वेळेत लक्ष न दिल्यास बाळाला डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणून अन्न व पाण्याची शुद्धता कोणत्याही परिस्थितीत ठेवायला हवी. हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया होतो. पावसाळ््यात पाणी तुंबून राहते. करवंट्या, शहाळी, जुने टायर, मडकी, गुरांची पाण्याची भांडी, जुन्या कॅनमध्ये पाऊस साचतो. त्याने, डेंग्यू व मलेरियाचे डास वाढतात. हे दोन्ही आजार जीवघेणे ठरू शकतात. घरातील गच्ची, अंगणात ठेवलेले रिकामे डबे, रंगाचे डबे, पाण्याच्या टाक्या, ड्रममध्ये पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते आणि त्यातूनच रोगांचा प्रसार होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. घरावरील पाण्याची टाकी किंवा फ्लॅटच्या तळघरातील टाकी पूर्णपणे रिकामी करणे शक्य नसते. अशा ठिकाणी डासांनी अंडी घालू नये त्यासाठी या टाक्या झाकणाने पूर्ण घट्ट बंद कराव्यात, जेणेकरून त्यात डासांचा शिरकाव होणार नाही. गच्चीत रिकाम्या भांड्यांतही नकळत पाणी साचते आणि डासांची पैदास होते. डेंग्यू, चिकुनगुनियाचा प्रसार अशातूनच होतो. कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया, डेंग्यू हे आजार होतात. खोकताना तोंडावर रु माल धरा, निरोगी लहान मुलांना रुग्णालयात किंवा दवाखान्यात घेऊन जाऊ नका, लहान मुलांना आजारी असताना शाळेत पाठवू नका, त्याने साथ पसरते, बाळांचे लसीकरण व्यवस्थित करा, घराजवळ पाणी साचू देऊ नका. (तालुका प्रतिनिधी)
अशुद्ध पाण्यापासून आजारांचा प्रसार
By admin | Published: June 15, 2016 12:49 AM