आज दूरदर्शन दिन : इमारतीची दुरवस्थाइंद्रपाल कटकवारभंडारातीन दशकांपूर्वी कोट्यवधी लोकांच्या मनोरंजनाचे साधन ठरलेले दुरदर्शन काळाच्या ओघात 'दुरचे दर्शन' ठरले आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या सिंंधी कॉलोनीसमोरील दुरदर्शन केंद्राची दुरवस्था पाहून लक्षात येते. दूरदर्शन दिनानिमित्त या केंद्राबद्दल घेतलेला आढावा.सुमारे दोन दशकांपूर्वी भंडारा शहरातील उत्तर दिशेला असलेला मेंढा परिसराच्या एका टोकाला दूरदर्शन रिले केंद्राची स्थापना करण्यात आली. १०० व्हॅट क्षमतेची यंत्रणा येथे प्रस्थापित करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात साकोली येथे १० व्हॅट व अन्य एका ठिकाणी मनुष्यविरहीत दूरदर्शन केंद्र स्थापित करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील हे केंद्र 'नो पॉवर ट्रान्समिशन' म्हणून ओळखले जाते. यापेक्षा मोठ्या क्षमतेचे रिले केंद्र गोंदिया येथे आहे. ज्या क्षेत्रात सदर केंद्र आहे त्या केंद्राच्या इमारत मालकी नगर परिषद भंडारा यांची आहे. या इमारतीला तळे गेली असून व्हरांड्याचा भाग केव्हा कोसळून पडेल याचा नेम नाही. या दूरदर्शन केंद्रातून सर्वात प्रथम डी. डी. नॅशनल त्यानंतर मेट्रो चॅनल व सद्यस्थितीत डी. डी. न्युज चॅनल दाखविण्याबाबत प्रक्षेपण केले जात आहे. केंद्राकडून तसेच मुंबई स्थळावरून प्रक्षेपित होणारे डी. डी. न्युज वरील कार्यक्रम जिल्हावासीयांना दाखविले जात आहे. इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे. शासनाच्या निकषानुसार सदर दूरदर्शन केंद्रातून कार्यक्रमाचे प्रसारण केले जात आहे. नागरिकांनी दूरदर्शनवरील नि:शुल्क चॅनेल्सचा उपयोग करावा. भविष्यात डीजीटायलेशन माध्यमाने कार्यक्रम दाखविण्यावर भर देण्यात येईल.- डी. एन. बारई, सहायक अभियंता, दूरदर्शन केंद्र, भंडारा.
जिल्हा मुख्यालयाचे दूरदर्शन केंद्र अडगळीत
By admin | Published: September 15, 2015 12:32 AM