शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आदिवासी विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीचे वाटप करा

By admin | Published: December 22, 2015 12:43 AM

आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत देण्यात येणारी सन २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्ती सन २०१५-१६ लोटत असताना अजूनही मिळालेली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : उत्तम कळपते यांची मागणीकरडी (पालोरा) : आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत देण्यात येणारी सन २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्ती सन २०१५-१६ लोटत असताना अजूनही मिळालेली नाही. सबरी घरकूल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मागील वर्षापासून घरकुलाचा लाभ देण्यात आलेला नाही. आदिवासी विकास प्रकल्पातर्फे संगणक, टंकलेखन आदिचे प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. वर्ग सुरु करण्यात यावे, उपरोक्त मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी कोका क्षेत्राचे जिल्हा परीषदेचे सदस्य उत्तम कळपते यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे.केंद्र सरकार मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीने लाभ दिले जातात. परंतु जिल्ह्यात सन २०१४-१५ ची शिष्यवृत्ती सन २०१४-१५ लोटत असतांनाही अजूनपर्यंत मिळालेली नाही. वाटपात मोठया प्रमाणात विलंब झालेला आहे. मागील वर्षापासून आदिवासी विद्यार्थी लाभापासून वंचित आहे. चालू सत्रामध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी मदत होते. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत नाही. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आर्थिक पाठबळ मिळते. परंतु मागील वर्षापासून आदिवासी विद्यार्थी वंचित आहेत. तत्काळ शिष्यवृत्तीचे वाटप होणे गरजेचे आहे.आदिवासी बांधवांना निवाऱ्याची अडचण भासू नये, यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सबरी घरकुल योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मागील वर्षापासून घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. पात्र लाभार्थ्यांना वारंवार कागदपत्रे मागवून त्रास दिला जात आहे. या अगोदरच लाभार्थ्यांनी योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज अर्जासोबत जोडलेले आहेत. त्याचबरोबर वारंवार कागपत्रांची पूर्तता करुनसुद्धा विभाग व त्यांचे कर्मचारी कामांकडे दुर्लक्ष करित आहेत. लाभार्थ्यांना विनाकारण वेठीस धरले जात आहे. लाभार्थ्यांना तत्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा, एकात्मिक विकास प्रकल्पातर्फे देण्यात येणारे संगणक व टंकलेखनाचे प्रशिक्षण वर्ग तत्काळ सुरु करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात जिल्हा परीषद सदस्य उत्तम कळपते, पंचायत समिती सदस्या नितू सेलोकर, सुजाता फेंडर, राजेंद्र चव्हाण, योगेश कळपते, नागेश कळपते, रवि पंधरे, गणेश वलके, राम आहाके, हितेश सेलोकर आदींचा समावेश होता. (वार्ताहर)