जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ५८ हजार सभासदांना २४६ काेटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले असून, कर्जवाटपाची टक्केवारी ९८ टक्के आहे. विशेष म्हणजे गत वर्षी या बॅंकेने ३२३ काेटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले हाेते. राष्ट्रीयीकृत बॅंका कर्ज वितरणात अद्यापही माघारलेल्या आहेत. या बॅंकांनी तत्काळ पीककर्ज देऊन आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला अग्रणी बॅंक व्यवस्थापक अशाेक कुंभलवार, जिल्हा उपनिबंधक मनाेज देशकर, नाबार्ड व्यवस्थापक संदीप देवगिरकर, आरसेटीचे संचालक सुजीत बाेदले आदी उपस्थित हाेते. यावेळी शासनपुरस्कृत याेजनांचा आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध याेजनांचा लाभ प्रकरणे बॅंकांकडे मंजुरीसाठी येतात त्यांना प्राधान्याने मंजुरी द्यावी, असे निर्देश दिले.
शेतकऱ्यांना ३३७ काेटींचे कर्ज वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:23 AM