यात भारताच्या संविधानाची जनतेला माहिती व्हावी. दररोज शक्य तितक्या उतारे वाचून करून जनतेला या संविधानाविषयी माहिती देण्यात यावी. या उद्देशाने मंदिर, मज्जीद, गुरुद्वारा, विहार येथे नि:शुल्क हिंदी, इंग्रजी, मराठी लिखाणाचे लिहिलेले संविधान पत्रिकेचे वितरण करण्यात आले. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासभा ठाणा, माजी सैनिक संघटना ठाणा, सुगत बुद्ध विहार परसोडी, गुरुद्वारा साहेब कमिटी जवाहर नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र भीमगिरी राजेदेगाव, करुणा बुद्धविहार इंदिरानगर, धम्मकीर्ती बुद्ध विहार सावरी, मिलिंद बुद्ध विहार कोंढी जवाहरनगर, हिरबाजी जागृत देवस्थान समिती कोंढी, मातोश्री रमाई बुद्धविहार फुलमोगरा, बोधीसत्त्व बुद्ध विहार मुजबी, बुद्ध विहार महात्मा फुले कालोनी भोजपूर येथे व नागपूर परिसरात १२४ संविधानाच्या प्रती वितरण करण्यात आले. सदर उपक्रमाचे परिसराातील नागरिकांनी संस्थेचे कौतुक केले.
संविधान पत्रिकेचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:32 AM