शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले कार्यकारी अभियंत्यांना फैलावर

By admin | Published: May 28, 2016 12:34 AM

जिल्हा परिषदेची जलसंधारण समिती व जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवारची औढावा बैठक आज शुक्रवारला घेण्यात आली.

३० जूनपर्यंतचा अल्टीमेटम : लघु सिंचाई विभागातील गैरप्रकारप्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषदेची जलसंधारण समिती व जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवारची औढावा बैठक आज शुक्रवारला घेण्यात आली. जिल्हा परिषदच्या बैठकीला अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखविल्याने ही बैठक ‘आॅल इज वेल’ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जलयुक्त शिवारच्या आढावा सभेत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी चांगलेच फौलावर घेतले. त्यांना जलयुक्त शिवारचे कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा ‘अल्टीमेटम’ देण्यात आला आहे.जिल्ह्यात सिंचन व्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाच्या अखत्यारित १ हजार १५४ मामा तलाव आहेत. या तलावांचा गाळ उपसा सुमारे २५० वर्षांपासून करण्यात आला नाही. त्यामुळे देखभाल दुरूस्ती व खोलीकरण केल्यास जलस्त्रोत वाढू शकते. यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झालेला आहे. मात्र, लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी कामे न करता काही आलेल्या निधीची गरज नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देऊन निधी परत पाठविला. काही कामांचे जानेवारी महिन्यात निविदा मागविल्या. परंतु कामांचे वर्कआॅर्डर अद्याप दिलेले नाही. याबाबत लोकमतने प्रकरण लावून धरले. पराते यांनी त्यांच्या कार्यकाळात लघु पाटबंधारे विभागात अनियमितता केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जलयुक्ंत शिवारसाठी अल्टीमेटम जलयुक्त शिवार योजनेसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे. लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता पराते यांच्या दिरंगाईमुळे कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शुक्रवारला आढावा बैठक बोलविली. यात लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता पराते यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून त्यांना चांगलेच फैलावर घेतले. लघु सिंचाई विभागाची जलसंधारणाची सर्व कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे अल्टीमेटम धीरजकुमार यांनी पराते यांना दिले. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आजच्या बैठकीत पराते यांना चांगलेच धारेवर धरले. ३० जूनपर्यंत कामे आटोपा अन्यथा कारवाईला सामोर जा, असा गर्भित इशारा दिला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आटोपताच पराते यांनी त्यांच्या अधिनस्थ सर्व अभियंत्यांना मंगळवारी बैठकीला उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.जलसंधारण सभेला पाठजिल्हा परिषदची जलसंधारण समितीची शुक्रवारला आढावा बैठक होती. मात्र, या बैठकीचे सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबईला बैठकीला गेल्यामुळे त्यांची जबाबदारी लघु सिंचाई विभागाचे पराते यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला गेल्याने पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मैदमवार यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. अधिकारी व काही पदाधिकारीही या बैठकीला नसल्याने औपचारीकता म्हणून ही महत्वाची बैठक आटोपती घेतली.