या आवाहनाला जिल्ह्यातील शेतकरी सभासदांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
बँकेचा २०२१-२०२२ चा खरीप पीक कर्ज वाटप हंगाम सुरू झालेला आहे. बँकेने १५ एप्रिलपासून कर्ज वाटप सुरू करण्याचे योजिले आहे. सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी बँकेला कर्ज वाटपाकरिता आवश्यक कागदपत्रे आपल्या संलग्नित शाखेला जमा करून आपल्या सभासदांना कर्ज वाटप चालू करावे, असे आवाहन सुनील फुंडे यांनी केले आहे. तसेच जे सभासद बँकेतून थेट कर्ज उचल करतात त्यांनीही संबंधित शाखेत आवश्यक कागदपत्रे सादर करून पीक कर्जाची उचल करावी असेही कळविले आहे. मात्र कर्ज दरखास्त शाखेत सादर करण्यापूर्वी बँकेने परिपत्रकीय सूचनेत कळविल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील, असेही फुंडे यांनी कळविले आहे.