शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’चे गुरूवारी थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:15 PM

संपूर्ण राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉडर््स’च्या विजेत्यांची ज्युरी मंडळाने मंगळवारी निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील साखरकर सभागृह, शास्त्री चौक भंडारा येथे या मानाच्या अ‍ॅवॉडर््सचे वितरण होणार आहे.

ठळक मुद्देज्युरी मंडळाने निवडले आदर्श सरपंच : साखरकर सभागृहात शेकडो गाव कारभाऱ्यांच्या उपस्थितीत होणार समारंभ

आॅनलाईन लोकमतभंडारा : संपूर्ण राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉडर््स’च्या विजेत्यांची ज्युरी मंडळाने मंगळवारी निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील साखरकर सभागृह, शास्त्री चौक भंडारा येथे या मानाच्या अ‍ॅवॉडर््सचे वितरण होणार आहे.लोकमत जिल्हा कार्यालयात मंगळवारी दुपारी झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली. ज्युरी मंडळामध्ये मानद वन्यजीव रक्षक प्रा. राजकमल जोब तथा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक आनंदराव चरडे यांचा समावेश होता.गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विजेत्या सरपंचांना अ‍ॅवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक विनिता साहू, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स-२०१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. गावाच्या विकासासाठी झटणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे.याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण १३ पुरस्कार दिले जाणार आहेत. सुरुवातीला जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिल्यानंतर या विजेत्यांचे राज्यपातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार? याची ग्रामीण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे.पार्लमेंट ते पंचायत‘लोकमत’ने आदर्श खासदारांना गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अ‍ॅवॉडर््स सुरू केले आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ हा पहिला माध्यम समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही गौरवित आहे. राज्यात पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत झाले आहे.सोहळ्यात होणार मंथनसरपंच अ‍ॅवॉडर््सच्या जिल्हापातळीवरील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामविकास व पंचायतराजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळ्यात घडणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.साक्षीदार व्हागावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी झटणाऱ्या मेहनती व कर्तबगार सरपंचांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’ या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने राज्य विधिमंडळापासून ते देशाचे सर्वोच्च कायदे मंडळ असणाऱ्या पार्लमेंटरी सदस्यांचा गौरव केला आहे़ तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ आपले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये सर्वांत महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!-विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहभारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित केले़ ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले़ शेतकऱ्यांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही लोकमतसोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला आहे़- रवींद्र शहाणे, उपाध्यक्ष (पणन), महिंद्रा फार्म डिव्हिजन.लोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला़ असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत आहे़ बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो यांचाही आम्हाला चांगला फायदा झाला आहे़ आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची वाढत आहे़-राजीव पोद्दार, सहव्यवस्थापकीय संचालक, बीकेटी टायर्स