लाखांदूर : बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा आनंदोत्सव म्हणजे तान्हापोळा हा सण होय. या तान्हापोळ्याच्या दिवशी तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या पुढाकारात चिमुकल्यांना नोटबुक पेन्सिलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम ७ सप्टेबर रोजी चिचोली अंतरगाव येथे आयोजित करण्यात आला होता. लहान मुलांचा तान्हापोळा हा सण असतो. या दिवशी लहान मुले आपल्या नंदीबैलाला सजवुन त्याला गावातील वरिष्ठांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत असतो. तालुक्यातील चिचोली येथील ग्रामपंचायतच्या पुढाकाराने गावातील जवळपास ६०० चिमुकल्यांना नोटबुक व पुस्तकांचे वितरण करुन तान्हापोळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच प्रमोद प्रधान, उपसरपंच प्रशांत मेश्राम, शंभु निमजे, हिरालाल रहेले, यादोराव निमजे, जयसिंग नान्हे, विश्वनाथ समरत, छगन बोकडे, मोरेश्वर निमजे, नरेश सोनटक्के, पो पा मोहन निमजे, रघुनाथ समरत, तुकाराम खरोले, शेखर निमजे, संजय मेश्राम, ओमप्रकाश करकाडे, तेजराम गेडाम, सोनल निमजे, आशा नैताम, सुंदरा उईका, अंकोश प्रतीके, अनसूया मेश्राम यांसह अन्य महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
080921\img-20210907-wa0011.jpg
चिमुकल्यांना नोटबुक पेन्सिलचे वितरण करतांना सरपंच प्रमोद प्रधान व अन्य