आमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गीतगायन व कोरोना लसीकरण जनजागृती गीत स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ येथील गायत्री मंदिरात पार पडला.
कार्यक्रमाला आमदार सहषराम कोरोटे, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन वहाणे, सहायक लेखा अधिकारी बागडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संजय बहेकार, नायब तहसीलदार अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम, नीळकंठ शिरसाटे, एस. जी. वाघमारे, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, जिल्हा कार्याध्यक्ष डी. एच.चौधरी, महेश ऊके उपस्थित होते.
प्रास्ताविक राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप तिडके यांनी केले. संचालन वाय. आय. रहांगडाले, अनिल टेंभुर्णीकर, बी. एस. केसाळे यांनी केले. आभार डी. व्ही. बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे किशोर डोंगरवार, संदीप मेश्राम, एन. बी. बिसेन, संदीप तिडके, डी. एच. चौधरी, कैलाश हांडगे, वाय. पी. लांजेवार, शरद उपलपवार, अनुप नागपुरे, दीक्षा फुलझेले, दिनेश बिसेन, किरण बिसेन, एस. डी. नागपुरे, क्रिस कहालकर, दिलीप लोधी, किशोर लंजे यांच्यासह शिक्षक समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.
यावेळी सत्यवान गजभिये, मुरलीधर खोटेले, सुनंदा ब्राम्हणकर, भारती तिडके, संदीप मेश्राम, दीक्षांत धारगावे, महेंद्र रहांगडाले, सुनंदा किरसान, वैशाली चौधरी, यज्ञराज रामटेके, मंगेश मेश्राम, पी. संतोषकुमार, डी. एन. गोप्लीवार, बी. एन. काळसर्पे, मनोज गेडाम, एम. वाय. मेश्राम, जे. एम. टेंभरे, उमेश रहांगडाले, सुरेश बोंबाडे, संगीता रामटेके, देवेंद्र नाकाडे, नामदेव पाटणे, लक्ष्मण आंधळे, पुंडलिक हटवार, अनिल कान्हेकर इत्यादी गुणवंतांचा आमदार कोरोटे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळात ऑनलाईन अभ्यासमाला राबविणारे उपक्रमशील शिक्षक महेंद्र रहांगडाले, जयपाल ठाकूर, सेवकराम रहांगडाले, अंजन कावळे व संदीप तिडके यांचाही सत्कार करण्यात आला.
या विजेत्यांचा केला सत्कार...
कार्यक्रमात कोरोना लसीकरण जनजागृती स्वरचित काव्य गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक अस्मिता खोब्रागडे, दि्वतीय क्रमांक सुनील शिंगाडे, तृतीय क्रमांक सुधीर खोब्रागडे यांनी पटकाविला. स्वरचित भीमगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक अस्मिता पंचभाई, दि्वतीय क्रमांक संयुक्तरित्या यज्ञराज रामटेके व रेखा शहारे, तर तृतीय क्रमांक किरण कावळे यांनी पटकाविला. काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक चंद्रकांत लांजेवार, दि्वतीय क्रमांक संयुक्तरित्या राजेंद्र बंसोड, मुरलीधर खोटेले यांनी पटकाविला.