लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. साखरकर सभागृह, शास्त्री चौक, लाल बहादूर शास्त्री शाळेसमोर भंडारा येथे दुपारी १२ वाजता हा सोहळा होईल.प्रमुख पाहुणे म्हणून तुमसरचे आमदार राजू कारेमोरे, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप उपस्थित राहणार आहेत.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पुरस्काराची निवड करण्यासाठी आयोजकांच्यावतीने विशेष ज्युरी मंडळाची स्थापना करण्यात आली होती.या विविध क्षेत्रातून मान्यवरांचा समावेश होता. प्राप्त प्रस्तावांचे विश्लेषण करुन १२ कॅटेगरी आणि एका विशेष पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सरपंचाची निवड केली आहे.या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवकांसह नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमतच्यावतीने करण्यात आले आहे.१२ कॅटेगिरी आणि एक विशेष पुरस्कारलोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्कार एकूण १२ कॅटेगिरीत दिले जातील. यात जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदन्योमुख नेतृत्व याचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ‘सरपंच आॅफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
‘सरपंच अवॉर्ड’चे वितरण आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 6:00 AM
लोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्कार एकूण १२ कॅटेगिरीत दिले जातील. यात जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदन्योमुख नेतृत्व याचा समावेश आहे.
ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थिती : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा गौरव