आॅनलाईन लोकमतसाकोली : स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या एन्व्होकेअर नेचर क्लबतर्फे पक्षी पक्षीजीवन संवर्धनाच्या दृष्टीने व उन्हाळ्यातील उष्णतेने तसेच पाण्याअभावी अनेक पक्षी दगावतात. पक्षीसंवर्धनासाठी जलपात्राचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर. त्रिवेदी होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी जी.आर. निखलंजे व श्वेता कमाने भुते उपस्थित होते.प्रास्ताविक नेचर क्लबचे प्रभारी डॉ.एल.पी. नागपुरकर यांनी केले. ते म्हणाले, पक्षी हे प्रत्येक स्थानिक जैवविधविधतेचे प्रतिक आहे. किटकांचे नैसर्गिक नियंत्रण, पराग सिंचन, कृषी व वन व्यवस्थेला समृद्ध करणे व निसर्गामध्ये चैतन्य निर्माण करण्याची कार्ये करतात. परंतु उन्हाळ्याच्या प्रचंड उष्णतेत एक एक थेंब पाण्याच्या शोधात भटकावे लागते. पाणी न मिळल्यास ते दगावतात व आपली जैवविधविधता कोलमडते, म्हणून जलपात्रे ठेवून पक्षी वाचविण्याचे आवाहन केले.१९९९ बॅचच्या नेचर क्लबच्या सदस्या राहिलेल्या श्वेता कमाने म्हणाल्या, नेचर क्लबसाठी काम करणे पर्यावरणाच्या व राष्ट्रीय दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. अशा अनेक उपक्रमातून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकीची आपल्याला जाणिव होते व जीवनाचा खरा अर्थ कळतो. अशाच उपक्रमातून मला संस्कार घडले. तुम्हीही घडवा असे त्या म्हणाल्या.जी.आर. निखलंज यांनी नेचर क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, तरुण वयात व महाविद्यालयीन जीवनात असे संस्कार होणे ही वन्यजीव संवर्धनासाठी चांगली बाब आहे. पक्षीजीवन वाचविण्यासाठी प्रयत्नशील असावे असे संबोधिले.महाविद्यालयाचे प्राचार्य एच.आर. त्रिवेदी म्हणाले, अनेक वर्षापासून नेचर क्लब अशा प्रकारची जनजागृती कार्यक्रम आयोजित करून कार्य करते ही प्रथा निरंतर सुरु आहे म्हणून सर्वांचे कौतुक केले.डॉ.सी.जे.खुणे व डॉ.अमित टेंभुर्णे यांनी ही जलपात्रे ठेवून पक्षीजीवन वाचविणे, त्यांचा अभ्यास करणे व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना कार्य करण्याचा आग्रह केला व मानवी संवेदना बळकट करावी असे संबोधले. नेचर क्लबच्या वतीने २५० जलपात्र विद्यार्थ्यांना व साकोली शहरातही दान करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पार्थवी रानपरीया हिने केले. कार्यक्रमासाठी सानिया काझी, विकास बावनकुळे, महेश लंजे, गौरव गणवीर, अजय मोहर्ले, छगन डोये, मोनीका झलक, मयुरी शेंडे, नम्रता खउके, दिव्या नाकाडे यांनी सहकार्य केले.
पक्षी संवर्धनासाठी जलपात्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:04 PM
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या एन्व्होकेअर नेचर क्लबतर्फे पक्षी पक्षीजीवन संवर्धनाच्या दृष्टीने व उन्हाळ्यातील उष्णतेने तसेच पाण्याअभावी अनेक पक्षी दगावतात. पक्षीसंवर्धनासाठी जलपात्राचे वितरण करण्यात आले.
ठळक मुद्देएन्व्होकेअर नेचर क्लबचा उपक्रम : साकोली शहरात २०० जलपात्र दान, मान्यवरांचे मार्गदर्शन