शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्हा प्रशासनाने केला आदर्श शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 10:50 PM

ज्ञानार्जनासोबतच समाजाभिमुख उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श ठरलेल्या जिल्ह्यातील आठ आदर्श शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यात सहा प्राथमिक, एक माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील आठ शिक्षकांचा समावेश : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्ञानार्जनासोबतच समाजाभिमुख उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श ठरलेल्या जिल्ह्यातील आठ आदर्श शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यात सहा प्राथमिक, एक माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजतापासून सुरू झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, समाजकल्याण सभापती रेखाताई वासनिक, महिला व बालकल्याण सभापती रेखाताई ठाकरे, बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल. एस. पाच्छापुरे, उपशिक्षणाधिकारी मोहन चोले अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद आदी उपस्थित होते. यावर्षी प्राथमिक शिक्षण विभागातून लाखनी पंचायत समितीच्या केसलवाडा (पवार) शाळेचे शिक्षक प्रमोद हरिदास खेडीकर, लाखांदूर पंचायत समितीच्या मेंढा येथील विनोद बक्षीराम ढोरे, पवनी पंचायत समितीच्या विरली खं. येथील यशवंत रामाजी लोहकर, मोहाडी पंचायत समितीच्या जांब येथील विजयकुमार भादुजी चाचेरे, तुमसर पंचायत समितीच्या वाहने शाळेचे अरुणकुमार यादवराव बघेले आणि साकोली पंचायत समितीच्या चांदोरी येथील संजय गुलाबराव नंदेश्वर यांचा अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व भेट साहित्य असे या पुरस्काराचे स्वरूप होते. माध्यमिक विभागातून लाखनी पंचायत समितीच्या पिंपळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे सहाय्यक शिक्षिका सारिका ज्ञानेश्वर दोनोडे तर विशेष शिक्षक गटात तुमसर पंचायत समितीच्या ढोरवाडा येथील मंजुषा ढोमण बोदेले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या सर्व सत्कारमूर्ती शिक्षकांनी ज्ञानदानासोबतच विविध उपक्रम राबविले आहेत.या सोहळ्यात शिक्षक पतीपत्नींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी पाच्छापुरे यांनी तर संचालन शिक्षिका स्मिता गालफाडे व सिद्धार्थ चौधरी यांनी केले. आभार उपशिक्षणाधिकारी मोहन चोले यांनी मानले.गिरी व गायधने सातारा येथे गौरवान्वितभंडारा जिल्ह्यातील पवनी येथील अशोक रामराव गिरी आणि तुमसर तालुक्याच्या सिहोरा येथील ओमप्रकाश बाबूराव गायधने यांनाही बुधवारी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.