लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील आठवडाभर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये दमदार हजेरी लावली होती. या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. आता पाऊस थांबल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी साठणाºया ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस, तर ऊन पडल्याने स्वाइन फ्लूचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते. जिल्ह्यात या आजाराचे रूग्ण आढळले नसले तरी जिल्ह्यात मोठया प्रमाणात विषमज्वर तापाची साथ असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयासह खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल दिसून येत आहे. यात प्रामुख्याने अंगदुखी, डोकेदुखी, हगवण, रक्तपेशीत घट होणे, उलटी होणे, आणि अंगावर पुरळ उठणे यासारख्या लक्षणे असलेल्या रूग्णांचा समावेश आहे. लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठया माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते. नागरिकांना कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच औषधांचा डोज पूर्ण करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.आजार टाळण्यासाठी उपाययोजनादूषित पाण्यामुळे अनेक आजारांची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे. शेतावर जाताना घरून शुध्द पाणी घेऊन जावे. नाले, ओढ्याचे व विहिरीतील पाणी पिण्यास वापरु नये. गावातील विहिरींचे शुध्दीकरण जलसुरक्षकांकडून नियमित करु न घ्यावे. नवीन विहिरीचे पाणी शुध्द केल्यावरच सेवन करावे. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. उघड्यावर शौचास बसू नये, लहान मुलांना देखील उघड्यावर शौचास बसवू नये, व्यक्तिगत शौचालय बांधून त्याचा वापर करावा. परिसरातील नाले गटारे साचू नयेत याची दक्षता घ्यावी, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, आजारी व्यक्तींना गरम पाणी द्यावे. अतिसार, थंडी, ताप यासंदभार्तील आजारांवर संबंधित आशा स्वयंसेविका, नर्स, आरोग्य सेवकांकडून उपचार करावा.
जिल्ह्यात विषाणूजन्य तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:18 AM
मागील आठवडाभर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये दमदार हजेरी लावली होती. या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. आता पाऊस थांबल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देरूग्णालये हाऊसफुल्ल : रूग्णांमध्ये आबालवृद्धांची संख्या जास्त