देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी ४३ टक्के कर्जवाटप झाले असून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेत आपल्या सभासद शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या ६४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. याउलट राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ सात टक्के कर्ज वितरण केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे शेतकरी सभासद खरीपाच्या तोंडावर बँकांचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील ९८ हजार २६० शेतकरी सभासदांना ४१४ कोटी ५० लाख रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला २५० कोटी रूपयांचे तर राष्ट्रीयकृत बँकांना ११४ कोटी २० लाख रूपयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यासोबत इतर व्यवसायीक बँका आणि विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेलाही कर्ज वितरणाचे उद्दीष्ट देण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार २६९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ४६ लाख रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. यात सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सेवा सहकारी संस्थांच्या मदतीतून जिल्हा बँकेने आतापर्यंत उद्दीष्टाच्या ६४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. ३४ हजार ६०२ शेतकऱ्यांना १५९ कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. याउलट राष्ट्रीयकृत बँकाने मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज वितरणात हात आखडता घेतला आहे. या बँकांना ११४ कोटी २० लाख रूपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत केवळ आठ कोटी २० लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. म्हणजे उद्दीष्टाच्या केवळ सात टक्के कर्ज वितरीत करण्यात आले आहे.पीक कर्ज वाटपात दोन महिन्यापुर्वी प्रारंभ झाला. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाला अद्यापही गती दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांचे उंबरठे झिजवित आहे. एकदा पावसाला सुरूवात झाली की, शेतकऱ्यांच्या रोवणीची लगबग सुरू होते. अशा स्थितीत बियाणे, खते, किटकनाशके खरेदीसाठी पैसे नसले तर शेतकºयांना सावकाराच्या दारातच जावे लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणात नेहमीच आखडता हात घेतात. त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसतो.असे आहे राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वाटपअलाहाबाद बँकेने ३७ शेतकऱ्यांना ३७ लाख अलाहाबाद बँकेने चार शेतकऱ्यांना ३.२४ लाख, बँक आॅफ बडोदाने दोन शेतकऱ्यांना एक लाख, बँक आॅफ इंडियाने ६२२ शेतकºयांना तीन कोटी ६१ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने २१७ शेतकऱ्यांना एक कोटी ५० लाख, कॅनरा बँकेने ११५ शेतकऱ्यांना ८१ लाख पाच हजार, देणा बँक सात शेतकºयांना आठ लाख ३ हजार, इंडियन ओव्हरसीस बँक १९ शेतकºयांना १५ लाख ३१ हजार, पंजाब नॅशनल बँक तीन शेतकऱ्यांना चार लाख, स्टेट बँक आॅफ इंडियाने १६५ शेतकºयांना एक कोटी १९ लाख १४ हजार, सिंडिकेट बँकेने २३ शेतकऱ्यांना १७ लाख ८४ हजार, युको बँकेने आठ शेतकऱ्यांना ९ लाख ३४ हजार, युनियन बँक आॅफ इंडियाने दोन शेतकऱ्यांना चार लाख तर विजया बँकेने पाच शेतकऱ्यांना सहा लाख ५० हजार रूपयाचे पीक कर्ज वाटप केले. यासह खाजगी क्षेत्रातील बँकांनी २४९ शेतकऱ्यांना २ कोटी ३३ लाख रूपये वितरीत केले आहे.शेतकऱ्यांची बँकभंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. यंदाही खरीप पीक कर्ज वाटपात बँकेने आघाडी घेतली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या नेतृत्वात बँकेचे महाव्यवस्थापक आणि विविध शाखांचे शाखा व्यवस्थापक शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्हा बँक ६४ टक्के, राष्ट्रीयीकृत सात टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:09 PM
जिल्ह्यात आतापर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी ४३ टक्के कर्जवाटप झाले असून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेत आपल्या सभासद शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या ६४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. याउलट राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ सात टक्के कर्ज वितरण केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे शेतकरी सभासद खरीपाच्या तोंडावर बँकांचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
ठळक मुद्देखरीप पीककर्ज : जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ४३ टक्के कर्ज वितरण, खरीप तोंडावर आला तरी शेतकरी बँकेच्या उंबरठ्यावर