मार्गदर्शन : सेंद्री येथे भारत सेवक महाविद्यालयाचे शिबिरकोंढा कोसरा : भारत सेवक सिद्धार्थ महाविद्यालय, कोंढा यांचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सेंद्री (खुर्द) येथे सुरु आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी गावाला भेट दिली असता त्यांनी शिबिरात येऊन शिबिरार्थ्यांसोबत हितगुज साधले. हितगूज साधताना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी, राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या विकासाचे व्यासपीठ आहे असे यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच होमराज उपरीकर, सरपंच मोखारा संध्या वासनिक, संस्था सचिव विकास राऊत, जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, पंचायत समिती सदस्य सुरेखा मेश्राम, पंढरी गायधने, महादेव बावणे, रविंद्र गायधने, लक्ष्मीकांत गायधने, चंद्रशेखर बौद्ध, गणपत बनकर, केवळराम गिरडकर, सचिव ब्राम्हणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.पटले यांनी केले. तर आभार प्रभारी प्राचार्य प्रदीप मेश्राम यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अधिकारी उषाकिरण मेश्राम, प्रा.मनिषा भुरे, प्रा.खांदाडे, प्रा. कोरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयीन कर्मचारी, शिबिरार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांनी साधले रासेयो शिबिरार्थ्यांशी हितगूज
By admin | Published: January 16, 2017 12:28 AM