काहीच दिवसांपूर्वी पक्षाने सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रशांत वाघाये यांना दिली. त्यानंतर आयोजित ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव धनंजय तिरपुडे, धर्मेंद्र नगरधने, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत निंबार्ते, लाखनी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू निर्वाण, माजी शहर अध्यक्ष विशाल तिरपुडे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून काँग्रेस पक्षात सोशल मीडिया विभागात कार्यरत मंडळी उपस्थित होती.
जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सर्वांची मते जाणून घेतली आणि कशा पद्धतीने रोडमॅप असला पाहिजे, यावर मार्गदर्शन केले. सोशल मीडिया विभाग लवकरच कार्यकारिणी तयार करेल आणि निश्चित यावर काम करेल, अशी माहिती प्रशांत वाघाये यांनी यावेळी दिली. बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांनीदेखील विविध सूचना याप्रसंगी दिल्या. सर्वांच्या सूचना स्वागतार्ह आहेत, त्यावरदेखील सोशल मीडिया विभाग निश्चित काम करेल, असेदेखील त्यांनी सांगितले. बैठकीला किसान काँग्रेसचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आनंद नागोसे, लाखनी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष धनपाल बोपचे, जि. प. क्षेत्र प्रमुख सुनील बांते, मनोज बंसोड, साकोली विधानसभा सोशल मीडिया विभाग अध्यक्ष अनूप मेश्राम, भंडारा तालुका मीडिया विभाग अध्यक्ष निखिल तिजारे, शुभम गभने, लेकराम ठाकरे, उत्तम भागडकर, स्वनिल खंडाईत, जय डोंगरे, योगेश गायधने, महेश वनवे, गणेश बोडनकर, गोविंद राऊत, अनिल बोधनकर, राधेश्याम लांजेवार, साजिद तुरक, बिट्टू सुखदेवे, समीर कोरे, उमेश गहाणे, दिगेश समरीत, भैरव सार्वे, हितेश निर्वाण, नीरज किंदर्ले, तेजस खंडाइत, सुहास ढेंगे, महेश नान्हे, सुरेश तलमले, सुहास पचारे, निखिल गायधने, अमित खोबरागडे, विकास बंसोड, साकेत सेलुकर, मोहित झलके, उल्हास भुरे, राजेश बोरकुटे, पवनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत गभने, निखिल गायधने, तेजस खंडाईत, सचिन पचारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
______________
*प्रतिक्रीया:*
पक्ष नेतृत्वाने मोठा विश्वास ठेवत ही जबाबदारी मला दिली, त्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, पक्षाचे सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. अभिजीत सपकाळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. मोहन पंचभाई यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. काँग्रेस पक्षाचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बुलंद ठेवण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया प्रयत्नरत राहील.
प्रशांत वाघाये
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस सोशल मीडिया विभाग.
160821\img-20210811-wa0110.jpg
photo