लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदार विधानसभा निहाय मतदार यादीत प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली या तीन विधानसभा मतदार संघात ९ लाख ९० हजार ६६५ मतदारांची नोंद करण्यात आली असून यात सहा हजार ९७७ मतदार आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध मतदार यादीतील एक हजार १३३ नावे वगळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ३१ आॅगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात तुमसर विधानसभा मतदार संघात तीन लाख एक हजार ७३० मतदारांची नोंद झाली असून त्यात एक लाख ५२ हजार ७८९ पुरूष आणि एक लाख ४८ हजार ९५१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात तीन लाख ७० हजार ६९० मतदार असून त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष आणि एक लाख ८५ हजार ४७४ महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या भंडारा विधानसभा क्षेत्रात अधिक आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात तीन लाख १८ हजार २४५ मतदार असून त्यात एक लाख ६० हजार ८२९ पुरूष आणि एक लाख ५७ हजार ४१६ महिला मतदार आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मुळ मतदान केंद्र याही निवडणुकीसाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यात १२०६ मतदार केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या केंद्रांसाठी पाच हजार ३१४ कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष १३२९, मतदान अधिकारी १३२९ आणि अन्य मतदान अधिकारी २६५६ नियुक्त करण्यात येणार आहे. निवडणूक निष्पक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी १८ नोडल अधिकारी, १२६ क्षेत्रीय अधिकारी, २५ सुक्ष्मनिरीक्षक, १६ फिरते पथक, १० स्थिर पथक, आवश्यक चलचित्रीकरण पथक, सात चलचित्र निरीक्षण पथक, चार खर्चनियंत्रक पथक नेमण्यात आले आहे. तसेच निवडणूक कामासाठी ३८२ वाहनांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गिते यांनी दिली.प्रशिक्षण वर्गात ईव्हीएम, व्हीव्हीपॅड यंत्राचा वापर, सोशल मीडिय, सी-व्हीजिल, वेबकॉस्टींग, जीपीएस प्रणालीचा वापर यासह टेस्ट वोट, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा आदीची माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदर्श आणि सखी मतदार केंद्र यावेळेसही राहणार असून त्यात तुमसर क्षेत्रात विहिरगाव, भंडारामध्ये जे.एम. पटेल महाविद्यालय मतदार केंद्र आणि साकोलीतील एकोडी, गडेगाव, चिंचोली या केंद्रांचा समावेश आहे. सखी मतदान केंद्रावर सर्व कारभार महिलांच्या हाती देण्यात येणार आहे.मॉक पोल पूर्णजिल्ह्यातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीनची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. मॉक पोलची (अभिरूप चाचणी) प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष पूर्ण करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात बीयु २२५०, सीयु १५५४, आणि व्हीव्हीपॅड १६५१ ईव्हीएम मशीनची उपलब्धता आहे. लोकसभेपेक्षा दहा टक्के मतदान वाढविण्याचा प्रयत्न जनजागृतीच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभाविपणे वापर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्यात ४७, ४४ दिव्यांग मतदार असून १२५९ चिन्हांकित मतदार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गिते यांनी केले.
जिल्ह्यात सहा हजार ९७७ नवमतदार वाढलेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 6:00 AM
लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मुळ मतदान केंद्र याही निवडणुकीसाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यात १२०६ मतदार केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या केंद्रांसाठी पाच हजार ३१४ कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष १३२९, मतदान अधिकारी १३२९ आणि अन्य मतदान अधिकारी २६५६ नियुक्त करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती, तीन विधानसभा क्षेत्रात ९ लाख ९० हजार ६६५ मतदार