सखी जल्लोष २०१५-१६ : सात तालुक्यांचा सहभागभंडारा : लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथे ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील खात रोड स्थित सनिज् स्प्रिंगडेल स्कूलमध्ये सखी जल्लोष २०१५-१६ या जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विजयी स्पर्धकांना बक्षिस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.सखी महोत्सवात एकल नृत्यू, युगल नृत्य (वेळ ५ मिनिट) समुहनृत्य व पथनाट्य वेळ ५ ते ७ मिनिट, ४ ते ८ सदस्यांचा संघ असावा एकपात्री अभिनय वेळ ३ मिनिट याप्रमाणे नियोजन राहिल स्पर्धकांनी नृत्यग’त पेन ड्राईव्हमध्ये आणने अनिवार्य आहे. अन्यथा स्पर्धेतून बाद करण्यात येईल. स्पर्धेसाठी ११ ते १२ या वेळेत सलाद डेकोरेशन व फ्लॉवर बुके स्पर्धा व हॅन्डीक्राफ्ट स्पर्धा घेण्यात येईल.महोत्सवादरम्यान व्यंजन, ज्वेलरी, इत्यादी स्टॉल आमंत्रित आहेत. जिल्हास्तरीय महोत्सवात साकोली, लाखनी, पवनी, तुमसर येथील प्रत्येकी स्पर्धेत विजयी प्रथम तीन स्पर्धक व संघ सखी जल्लोष स्पर्धेत आपले कौशल्य सादर करतील. करिता तालुक्यातील विजयी स्पर्धक सखी विभाग प्रतिनिधी लाखनी शिवानी काटकर, साकोली सुचिता आगाशे, पवनी अल्का भागवत व तुमसर रितु पशिने यांच्याकडे दि.६ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी.भंडारा शहरातील स्पर्धक व संघानी दि.६ जानेवारी पर्यंत जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार ८०८७१६८३५२ व सखी प्रतिनिधी स्रेहा वरकडे ८४८४०७९८५७ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय सखी महोत्सव
By admin | Published: January 03, 2016 1:09 AM