अर्ज सादर करण्याचे आवाहन
भंडारा : युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व युवक संचालनालय पुणेच्या वतीने दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने हा महोत्सव 25 डिसेंबर रोजी व्हर्च्यूअल पध्दतीने म्हणजे ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या महोत्सवात अनेक कला प्रकारांचा समावेश असून युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनिस यांनी केले आहे. एकपात्री प्रयोग (हिंदी इंग्रजी), शास्त्रीय गायन, हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, वकृत्व, लोकनृत्य व लोकगीत आदी स्पर्धा या महोत्सवात घेण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील १५ ते १९ वर्ष वयोगटातील कलावंतांनी आपले अर्ज २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे सादर करावे. बाबनिहाय स्पर्धकांची वेळ निश्चीत करुन त्या त्या स्पर्धकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात येतील. तसेच ज्या स्पर्धकांची प्रवेश अर्ज प्राप्त होतील. त्यांना लिंक तयार करुन कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन, व्हर्च्यूअल पध्दतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येवुन प्रथम क्रमांकाचा स्पर्धक विभागीय युवा महोत्सवाकरीता नागपूर येथे पात्र होईल. सहभागी कलावंत (स्पर्धक) यांनी आपले प्रवेश अर्ज, मोबाईल नंबर, पत्ता, संस्थेचे नाव, आदीसह कार्यालयामध्ये नोंदणी करावे. त्यानंतरच कार्यक्रमाची रुपरेषा संबंधितांना कळविण्यात येईल.