उद्घाटन प्रगती महिला कला महाविद्यालयाच्या सचिव डॉ. जयश्री देशकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम चरडे होते. प्रमुख पाहुणे रेखाताई देशकर, डॉ. ज्योती नाततोडे, प्रा. तेजपाल मोरे, डॉ. जयश्री सातोकर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी, संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी डॉ. क्रिष्णा पासवान यांनी केले. तर आभार रमेश अहिरकर यांनी मानले. जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमात जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्र व जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना भंडाराचे ३८ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम कुलदीप खोब्रागडे, व्दितीय विधी वर्मा, तृतीय सोनिया शर्मा यांची निवड करण्यात आली. यशस्वितेसाठी शालू पिल्लारे, शुभांगी भिवगडे, जोशेष वाढई, आदित्य धारगावे, प्रशांत घरडे यांनी परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:23 AM