शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जिल्ह्याची वाटचाल अनलाॅक ‘लेव्हल वन’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 5:00 AM

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने ७ जूनपासून अनलाॅक प्रक्रियेला सुरुवात केली. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडवरून अनलाॅक प्रक्रियेच्या काेणत्या टप्प्यात जिल्हा आहे, याची वर्गवारी करण्यात आली. भंडारा जिल्ह्याचा गत आठवड्यात पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के आणि भरलेले ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के हाेते. ज्या ठिकाणचा पाॅझिटिव्ही रेट ५ टक्क्यापेक्षा कमी आणि २५ टक्क्यापेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहे.

ठळक मुद्देसाप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट १.२२ : ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण १.६० टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली. पाच टप्प्यात जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली. निकषानुसार भंडारा जिल्हा अनलाॅक प्रक्रियेच्या लेव्हल तीनमध्ये आला. अंशत: अनलाॅक प्रक्रियेला प्रांरभ झाला. आता आठवड्याभरात रुग्णसंख्या वेगाने कमी झाल्याने साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट १.२२ टक्क्यापर्यंत खाली आला असून ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्याही १.६० टक्केच आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल अनलाॅक प्रक्रियेच्या लेव्हल वनकडे असून प्रशासन याबाबतचा आदेश केव्हा निर्गमित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने ७ जूनपासून अनलाॅक प्रक्रियेला सुरुवात केली. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडवरून अनलाॅक प्रक्रियेच्या काेणत्या टप्प्यात जिल्हा आहे, याची वर्गवारी करण्यात आली. भंडारा जिल्ह्याचा गत आठवड्यात पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के आणि भरलेले ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के हाेते. ज्या ठिकाणचा पाॅझिटिव्ही रेट ५ टक्क्यापेक्षा कमी आणि २५ टक्क्यापेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहे. तेथे पहिल्या टप्प्याचे निकष लागू करण्यात आले. परंतु भंडारा जिल्ह्यात भरलेले ऑक्सिजन बेड कमी असले तरी पाॅझिटिव्हिटी रेट निकषापेक्षा अधिक हाेते. त्यामुळे जिल्ह्याला अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या लेव्हलमध्ये समाविष्ट करण्यात आले. सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.आता आठवड्याभरात भंडारा जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या वेगाने कमी झाली आहे. आठवड्याभरात ११ हजार २२४ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ १३७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट एकदम खाली म्हणजे १.२२ टक्क्यावर आला आहे. दुसरीकडे ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही ४.४१ टक्क्यांवरून १.६० टक्क्यांवर आली आहे. जिल्ह्यात १० ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू असून ५९३ रिकामे बेड आहेत. तर व्हेंटिलेटर असलेले दाेन बेडवर उपचारासाठी रुग्ण दाखल असून १४३ बेड रिकामे आहेत. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचे भरलेले बेड १२ असून ७३६ बेड रिकामे आहेत. रुग्णांची संख्या वेगाने कमी झाल्याने जिल्ह्याची वाटचाल लेव्हल वनमध्ये सुरू झाली आहे. लेव्हल वनचे सर्व निकष भंडारा जिल्हा पूर्ण करीत आहे. आता केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. लेव्हल वनमध्ये आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व दुकाने व व्यापार सुरू ठेवता येणार आहे. मात्र जिल्हा प्रशासन लेव्हल वनच्या आदेशाबाबत विचार करीत असल्याचे दिसून येते. ज्या जिल्ह्यांना लेव्हल वनची सूट मिळाली. त्या जिल्ह्यांमध्ये काेराेना रुग्ण वाढत असल्याचा अनुभव आहे. 

शुक्रवारी ९० काेराेनामुक्त, २४ पाॅझिटिव्ह- जिल्ह्यात शुक्रवारी ९० व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली तर २४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. कुणाच्याही मृत्यूची नाेंद घेण्यात आली नाही. १६२१ व्यक्तींची चाचणी करण्यात आल्यानंतर भंडारा तालुक्यात ७, माेहाडी ०३, तुमसर २, पवनी ४, लाखनी १, साकाेली ३ आणि लाखांदूर तालुक्यात ४ असे २४ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या ४०१ व्यक्ती उपचाराखाली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५९ हजार २५६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी ५७ हजार ८०० व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली तर १०५५ जणांचा काेराेनाने बळी गेला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या