शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:33 PM

सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा फटका : सात टक्के क्षेत्रात झालेली रोवणीही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.भंडारा जिल्ह्यात खरीपाचे लागवड लायक क्षेत्रफळ दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. सर्वाधिक एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. यासोबतच तूर, मुंग, उळीद, तिळ, सोयाबीन आणि ऊसाचे पिकही घेतले जाते. भंडारा हा भात उत्पादक जिल्हा या पिकासाठी पावसाची मोठी आवश्यकता असते. परंतु सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पावसात शेतकºयांनी आपल्या शेतात पºहे टाकले. पºहे लावडलायक होत नाही तोच पावसाने पुन्हा दडी मारली. गत तीन आठवड्यापासून तर पावसाचा पत्ता नाही. या कालावधीत सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांनी रोवणी केली. २० जुलैपर्यंत जिल्ह्यात १३ हजार १० हेक्टरवर रोवणी आटोपली होती. ती धान क्षेत्राच्या केवळ ७.१७ टक्के आहे.शेतात पºहे लागवडलायक झाले आहेत. पावसाचा पत्ता नाही. पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. टँकर लावून पºहे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मोठा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. आता पाऊस आला तरी पºहे रोवणीच्या कामी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा शेतकºयांची जमीन पडीत राहण्याची भिती आहे.मूग व उळीद पेरणीला प्रारंभच नाहीजिल्ह्यात उळीद आणि मूगाचे पीक धानपिकासोबत घेतले जाते. परंतु यावर्षी अद्यापही या दोनही पिकाची लागवडच झाली नाही. तिळाच्या ५२४ हेक्टरपैकी ५५ हेक्टरवर लागत झाली आहे.तूर उत्तम, सोयाबीन धोक्यातगत काही वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी तूर आणि सोयाबीनकडे वळले आहे. जिल्ह्यात यंदा तुरीचे निर्धारित क्षेत्र ११ हजार ७४ हेक्टर आहे. कृषी विभागानुसार २० जुलैपर्यंत सात हजार ५७५ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. तर सोयाबीनचे क्षेत्र आठ हजार ११९ हेक्टर असून आतापर्यंत २२१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्यस्थितीत तुरीची स्थिती उत्तम असली तरी सोयाबीन मात्र धोक्यात दिसत आहे.