लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविला जात आहे. या अभियानांतर्गत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असून शिक्षणावर अमाप खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत या उपक्रमाचा पुरता बोजवारा उडाला आहे. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोली प्रकरणावरून दिसून येत आहे.त्यांच्यावर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खोलमारा (जुना) येथील जि.प. शाळेत इयत्ता १ ते ४ ची शाळा आहे. या शाळेला पूर्वी दोन वर्गखोल्या होत्या. मात्र यापैकी एक वर्गखोली ही पडक्या स्वरुपाची असून छतावरील कवेलू तथा फाटे पूर्णत: तुटलेले व कुजलेले आहेत. भिंतीला तडे गेले असून छताला मोठे भगदाड पडलेले आहे. त्यामुळे ही वर्गखोली विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याने ते वर्गखोली बंद ठेवण्यात आली.खोलमारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ वर्ग असून ५० च्या आसपास विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्या बघता येथे वर्गखोल्यांची आवश्यकता आहे.मात्र जीर्ण वर्ग खोली बंद ठेवल्यापासून सर्व १ ते ४ चे विद्यार्थी एकाच वर्गखोलीत बसवावे लागत आहे. एकाच वर्गखोलीत बसवून चार वर्गाचे शिकवणी घेणे शिक्षकांसाठी फार अडचणीचे असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी तथा गावकऱ्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच जनप्रतिनिधींना वारंवार ही बाब लेखी निवेदने देवून लक्षात आणून दिली. मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले.दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने शाळा बंद पडत आहेत. तर दुसरीकडे जास्त पटसंख्या असलेल्या शाळेकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पालकवर्गातून नाराजीचा व रोष व्यक्त केला जात आहे.शासनाने याकडे असेच दुर्लक्ष केले तर उरल्या सुरल्या जि.प. शाळाही बंद पडतील अशी भीती पालकवर्गानी व्यक्त केली आहे आणि पालकांना खासगी शाळेत प्रवेश द्यावा लागेल. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.तरी शासनाने याकडे लक्ष देवून नवीन वर्गखोली मंजूर करून बांधकाम करावे अशी मागणी पालक तथा गावकऱ्यांनी केली आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या छताला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 9:52 PM
राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविला जात आहे. या अभियानांतर्गत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असून शिक्षणावर अमाप खर्च करीत आहे.
ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष : खोलमारा येथील प्रकार, पालक म्हणतात, पाल्यांना खासगी शाळेत पाठवायचे काय?