करडी (पालोरा) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले. विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करीत शाळेचे नावलौकीक केले. १४ वर्ष वयोगटात मुकेश केशव नंदूरकर याने २०० मिटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्ष वयोगटात लक्ष्मी सुखराम भोयर ८०० मिटर तसेच १५०० व ३००० मिटर स्पर्धेत प्रथम स्थान मिळविला. वैशाली विजय मोहतुरे हिने २०० मिटर धावणे स्पर्धेत प्रथम स्थान मिळविला. तर १५०० मिटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. सलोनी शैलेश बेहलपांडे हिने तिहेरी उडी स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले. पायल राजू मोटघरे हिने ३ कि.मी. पायी चालणे स्पर्धेत द्वितीय स्थान मिळविला. आकाश सुरेश भोयर ५ कि.मी. चालणे स्पर्धेत प्रथम स्थान मिळविला.१९ वर्ष वयोगटात राष्ट्रपाल मंगल भोयर याने ८०० मिटर व १५०० मिटर स्पर्धेत प्रथम स्थान मिळविला. विलास भूमेश्वर जमईवार याने तिहेरी उडी स्पर्धेत द्वितीय स्थान पटकाविला. अपेक्षा विकास रोडके हिने थाळीफेक स्पर्धेत द्वितीय स्थान मिळविले. १६ वर्षे वयोगटात (पायका) वैशाली विजय मोहतुरे हिने १५०० व ३००० मिटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. वैशाली विजय मोहतुरे, मोनिका केवळराम सेलोकर, मोनिका राजू भोयर, पल्लवी योगराज कांबळे रिले स्पर्धेत प्रथम स्थान मिळविला. महिला खुल्या गटात लक्ष्मी सुखराम भोयर हिने ८०० व १५०० मिटर प्रथम क्रमांक मिळविला. क्रास कंट्री स्पर्धेत राष्ट्रपाल मंगल भोयर, महेश दुधराम तितीरमारे, आकाश जगदिश खंडरे, वैशाली विजय मोहतुरे, लक्ष्मी सुखराम भोयर, मोनिका राजू भोयर, मोनिका केवळराम सेलोकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य दयाळनाथ माळवे, क्रीडा प्रशिक्षक बी.एस. टेंभरे, सहाय्यक एस.डी. आळे, मार्गदर्शक निशिकांत इलमे यांनी कौतुक केले. जि.प. सदस्या निलीमा इलमे, गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांनी कौतूक केले. (वार्ताहर)
करडीच्या विद्यार्थ्यांनी गाजविली जिल्हा क्रीडा स्पर्धा
By admin | Published: October 12, 2015 1:10 AM