२१ वर्ष मुलींचा संघ विभागातून तृतीय
२४लोक०६
साकोली : महाराष्ट्र राज्य व्हाॅलिबाॅल असोसिएशनतर्फे जिल्हा व विभागीय स्पर्धा खापरखेडा, वर्धा या ठिकाणी मुलामुलींच्या व्हाॅलिबाॅल स्पर्धा घेण्यात आल्या. १६ वर्ष मुलींच्या संघात विशाखा बंधाटे, ऋचिका कांबळे, त्रिशा भुरे, ऋती शहारे, वृषल सेलोकर, साक्षी लुटे व २१ वर्ष मुलींच्या संघात सुहानी ठाकरे, जोया खान, समीक्षा गजबे, अंकिता गाडे, प्रिया माडे, मयूरी जमजार, पूजा राऊत, प्राची आठवले, मंजुषा अतकरी, हिना भदाडे या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय व्हाॅलिबाॅल स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. १८ वर्ष मुलांच्या संघात आर्यन टेंभूर्णे, सुधांशू धांडे, केदार हेमणे, सुरेंद्र राऊत, पीयूष बांगरे, गुणेश गजबे, जयगुरी कोहळे, तेजस बाभुळकर, अजिंक्य पवार, वेदांत चव्हाण, २१ वर्ष मुलांच्या संघात अनिकेत नागोसे, गगन खोब्रागडे, युवराज बोबडे, अजय वलथरे, राहुल भानारकर, पीयूष खोटेले, भूषण गजबे, गौरव पुराम, वेदांत हेमणे, मोहित कुंभरे यांचा समावेश होता.
विभागीय स्पर्धेचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात जिल्हा व्हाॅलिबाॅल संघटनेचे सहसचिव शाहीद कुरैशी यांनी खेळाडूंना सांगितले की, १६ वर्षाखालील मुले-मुली यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१ ला होणार होत्या. परंतु कोरोना महामारीमुळे शासनाची परवानगी मिळाली नसल्यामुळे पुढील आदेशापर्यंत स्पर्धा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. याप्रसंगी १६ वर्ष मुलींचा व २१ वर्ष मुलींचा संघ विभागीय स्पर्धेत द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल असोसिएशनतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संघाचे प्रशिक्षक गिरीश निर्वाण व सुनील गजबे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सहभागी सर्व खेळाडूंचे अभिनंदन सुनील फुंडे, प्रा.अशोकसिंग राजपूत, सलीम अन्सारी, दीपक रायपूरकर, क्रीडा मार्गदर्शक भोजराम चौधरी, राहुल राऊत व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.