लोकमत न्यूज नेटवर्कविरली/बुज : येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान ग्रामप्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरु केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.ईटान येथील वैनगंगा नदीवरील वाढीव पाणीपुरवठा योजनेतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी गावात सुमारे ४५० नळ जोडण्या असून ५ सार्वजनिक नळकोंडाळे आहेत.सध्या स्थितीत गावकऱ्यांना पुरविण्यात येणारे पाणी एवढे गढूळ आहे की, ते पिणे तर दुरच पण त्या पाण्याने आंघोळ करणे, कपडे धुने ही कठीण आहे. या पाण्यामुळे गावात सर्दी, खोकल्यासारखे आजार बळावले असून अतिसारासारखे जलजन्य रोग पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान गावात साजन बोकडे (४०) व सपना बोकडे (३५) या दोघांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरु आहेत. यावर्षी जलशुध्दीकरण औषधीचे वाटप करण्याचा ग्रा.पं. विसर पडला.जलपुर्नभरणाकडेही कानाडोळावैनगंगेवरील वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापुर्वी विरलीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या विहिरीवर होती. सदर योजना सुरु झाल्यानंतर या पाणी साठवण विहीरकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. या पाणीसाठवण विहिरीनी सुमारे आठ वर्षे विरलीकरांची तहान भागविली. वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यानंतरही मागील वर्षीपर्यंत पावसाळ्याच्या दिवसात या पाणी साठवण योजनेच्या विहिरीतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे गढूळ पाण्याची समस्या उद्भवत नव्हती. परंतु सध्या या विहीरीमध्ये गाळ साचल्याने या विहिरीमधील जल पुनर्भरण प्रक्रिया बंद पडली. विहिरीमधील गाळ उपसणे शक्य न झाल्याने गावकºयांवर गढूळ पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे.
विरलीत होतोय दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 9:08 PM
येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठळक मुद्देआरोग्याशी खेळ : अनेक आजार बळावले, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष