दिव्यांग व्यक्ती समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम ७ फेब्रुवारी १९९६ पासून लागू झाला आहे. तसेच दिव्यांग अधिनियम कायद्यान्वये दिव्यांग व्यक्तीचा सर्वांगीण विकासासाठी व त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आल्या आहेत. मुरमाडी सावरी येथील दिव्यांगांना शासन निर्णयाप्रमाणे अद्याप पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे दिव्यांगांचे जगणे कठीण झाले आहे. राखीव निधी दिव्यांगांवर खर्च करा अन्यथा कुलूप ठोकण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवी मन, जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, तालुकाध्यक्ष सुनील कहालकर, लाखनी तालुका सचिव सुनील हटवार, लाखनी शहर अध्यक्ष रामचंद्र निर्वाण, लाखनी शहर सचिव प्रेमचंद्र निर्वाण, उपाध्यक्ष महेश घनमारे, विष्णुदास पडोळे, रमेश गायधणी यांनी दिला.
310721\img-20210731-wa0016.jpg
photo