शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

दिव्यांग मनोहर ठरला स्वच्छतेचा ‘आॅयडॉल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 11:25 PM

हातावर आणून पानावर खाण्याइतपत कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. त्यातच एका पायाला अपंगत्व. कुटुंबात पत्नी, मुलगा व मुलगी असा चौघांचा गाढा हाकताना केवळ पत्नीच्या हिमतीवर त्याने घर आणि वैयक्तिक शौचालय बांधून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. आता हा दिव्यांग मनोहर जिल्ह्यात स्वच्छतेचा ‘आयडॉल’ ठरला आहे.

ठळक मुद्देलोकमत प्रेरणावाट : अंपगत्वावर मात करीत साकारले घर व शौचालय

नंदू परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हातावर आणून पानावर खाण्याइतपत कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. त्यातच एका पायाला अपंगत्व. कुटुंबात पत्नी, मुलगा व मुलगी असा चौघांचा गाढा हाकताना केवळ पत्नीच्या हिमतीवर त्याने घर आणि वैयक्तिक शौचालय बांधून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. आता हा दिव्यांग मनोहर जिल्ह्यात स्वच्छतेचा ‘आयडॉल’ ठरला आहे.लाखांदूरपासून १५ कि.मी. अंतरावर किरमिटी हे गाव वसलेले आहे. अवघ्या तेराशे लोकवस्तीच्या या गावात २४५ कुटूंबांचे वास्तव्य आहे. सभोवताल शेत आणि मध्यभागी गाव असलेल्या किरमटीतील लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.याच गावात मनोहर धर्माजी कावळे (३०) यांचे घर आहे. २० बाय २० जागेत त्याचे कौलारू घर आहे. लहानपणी पोलिओमुळे त्याच्या डाव्या पायाला अपंगत्व आले. काठीच्या आधाराने तो चालतो. काठी नसली तर तो चालूही शकत नाही. परंतु अपंग असल्याचे तो स्वत:ला कधी जाणवू देत नाही. काठीचा आधार शरीराला मिळाला तसा पत्नीचा आधार त्याला संसाराला मिळाला आहे. पती दिव्यांग असल्याने संसार कसा चालवायचा याची यत्कींचितही चिंता न करता हे दाम्पत्य मुलांना शिक्षण देत आहेत.अशातच २०१६ मध्ये किरमटी गावाचा ‘स्वच्छ भारत मिशन’ कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाबाबत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्या कुटूंबांकडे शौचालय होते ते वापर करायचे परंतु ज्यांच्याकडे शौचालये नव्हती ते कुटूंब उघडयावर जात असल्याचे दिसून आले. उघडयावर शौचास जाण्यामुळे वातावरण प्रदूषित झाले. त्याहून जास्त अस्वच्छतेचा त्रास महिला पुरूषांना सहन करावा लागत होता. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमातून गावात शौचालय बांधण्यात येणार असल्यामुळे उघडयावर जाण्याचे चित्र बदलेल या दिशेने ग्राम पंचायतचे पदाधिकारी झपाटले आणि मिशन सुरू झाले.ग्रामपंचायतच्या यादीत मनोहरचे नाव होते. शौचालय बांधकामाचा त्याला आग्रह करण्यात आला. परंतु अपंगत्व असल्याने शौचालयात कसे बसता येईल, असे त्याला वाटत होते. परंतु उघडयावर शौचासाठी जाताना होणाºया त्रासापेक्षा हा त्रास मोठा नव्हता, हे त्याच्या लक्षात आले. उघडयावर जाण्यामुळे कुटूंबांची जाणारी लज्जास्पद स्थितीचे शल्य पत्नीला होते. राहायला पक्के घर नव्हते. आणि शौचालय बांधायची ही समस्या त्याच्यासमोर होती. त्यामुळे पक्के घर असावे ही इच्छा असूनही पूर्ण कसे होणार? असा प्रश्न त्याच्या समोर होता.अशातच वडिलोपार्जित हिस्स्यातून मिळालेल्या वाट्यातून या दाम्पत्याने घर बांधकामाचा निर्णय घेतला. छताच्या एका बाजूला टिना तर दुसºया बाजूला कवेलू टाकून घर बांधले. घराच्या एकाच खोलीत चूल आणि मुल असा संसाराचा गाडा सुरू झाला.अशातच गावात स्वच्छतेचे वारे सुरू झाले. अनुदान मिळणार होते. शौचालयामुळे घराला घरपण मिळणार असल्याने मनोहरने शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. रोजी रोटी करून मिळविलेले पैसे व शासनाकडून दिव्यांगांसाठी मिळणारे अनुदान यातून बचत केलेल्या पैशातून शौचालयाची पायाभरणी केली. काही दिवसातच मनोहरच्या घरासमोर शौचालय उभा राहिले. उघडयावर जाण्यामुळे मनोहरचा त्रास कमी झाला. छोटयाशा गावात मनोहरने शौचालयासाठी घेतलेला पुढाकार व्याख्यानाजोगा आहे. उघड्यावर जाणाºया गावासाठी मनोहर हा आता हागणदारीमुक्त गावाचा आयडॉल ठरला आहे.