लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारतीय रेल्वे जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा दावा करते. दिव्यांगाप्रती सहानुभूती असल्याचे सांगते. त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेते. मात्र तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील दिव्यांगांसाठी असलेले शौचालय मात्र कुलूपबंद आहे. त्यामुळे दिव्यांगांची कुचंबना होत आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व रेल्वेचे प्रमुख स्थानक आहे. दररोज हजारो प्रवाशी येथून ये जा करतात. रेल्वे प्रशासनाने दिव्यांगांना सुलभ व्हावे यासाठी शौचालय बांधले आहे. सदर शौचालय रेल्वे सुरक्षा बल कार्यालयाजवळ आहे. हे शौचालय सध्या मात्र कुलूपबंद स्थितीत आहे. त्यामुळे दिव्यांग रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकात प्रवेश द्वारावर हे शौचालय आहे. प्रवेशद्वारापासून काही अंतरावर शौचालय असल्याने ते सहसा दिसतही नाही. शौचालय बांधताना जागेची निवड नियोजनपूर्वक करणे गरजेचे होते. दिव्यांग प्रवाशांना सोयीचे होईल अशा ठिकाणी शौचालय बांधणे गरजेचे होते. परंतु सर्व बाबींना बगल देत शौचालय बांधले. मात्र आता हे शौचालय चक्क कुलूपबंद केले आहे. या शौचालयाची देखरेख व चावी स्टेशन अधीक्षकांकडे असते अशी माहिती आहे.तुमसर रेल्वे स्थानकावरील दिव्यांगांचे शौचालय सुरु असते. घाण होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी शौचालय बंद केले असेल. याची चौकशी केली जाईल.-राजेश गिरी, स्टेशन अधीक्षक, तुमसर रोड.
दिव्यांगांचे शौचालय कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 9:33 PM
भारतीय रेल्वे जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा दावा करते. दिव्यांगाप्रती सहानुभूती असल्याचे सांगते. त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेते. मात्र तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील दिव्यांगांसाठी असलेले शौचालय मात्र कुलूपबंद आहे. त्यामुळे दिव्यांगांची कुचंबना होत आहे.
ठळक मुद्देदिव्यांगांची कुचंबना : तुमसर रेल्वे स्टेशनवरील प्रकार