लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफूल पटेल यांनी केले.गुरूवारी विजयादशमीनिमित्त भंडारा येथे आगमन झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खा. पटेल बोलत होते. ते पुढे म्हणाले, यावर्षीच्या हंगामात पाण्याची गरज असतानाही प्रकल्पाचे पाणी वेळेवर सोडण्यात आले नाही. विशेष म्हणजे याबाबत सदोष नियोजन करण्यात आले. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. त्यातही धान पिकावर रोगांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नुकसानीत वाढ होणार आहे. दुसरीकडे ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भारनियमन वाढले आहे. ही सर्व बाब नैसर्गीक आपत्ती नसून मानव निर्मित आहे. पीक विम्याबाबत तर लाभ कुणाला व केव्हा मिळाला याचीही संभ्रमता कायम आहे. शासनाने यासर्व बाबींवर गांभीर्याने लक्ष देवून शेतकºयांना तुर्त दिलासा म्हणून प्रती क्विंटलमागे एक हजार रूपये बोनस द्यावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा खणखणीत इशाराही सरकारला दिला.जिल्ह्यातील आरोग्य सेवेबाबत बोलताना खा. पटेल म्हणाले, महिला रुग्णालयाचा प्रश्न अजुनपर्यंत मार्गी लागला नाही. मोठ्या प्र्रमाणात डॉक्टर, परिचारिका यासह अन्य पदे रिक्त आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत प्रशासनाने खेळ मांडला आहे. पुनर्वसन पूर्ण न होता त्यापुर्वीच धरणाची पातळी वाढविल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यादेखत धानपिके पाण्याखाली आली आहे. शबरीमाला प्रकरणाबाबत ते म्हणाले की, न्याय व्यवस्थेने संस्कृती व परंपरेला व तसेच नागरिकांच्या भावनांना लक्षात घेवून संतुलीत निर्णय घेतला पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जयंत वैरागडे, रामलाल चौधरी, यशवंत सोनकुसरे यासह राकाँचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यांऐवजी जिल्ह्याचे सर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:02 PM
भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देप्रफुल पटेल : पत्रपरिषद धानाला एक हजार रूपये बोनस द्या