लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.पेंच प्रकल्पाच्या वरच्या भागात मध्य प्रदेशात चौराई धरण बांधण्यात आले. त्यामुळे तीन वर्षांपासून भंडारा, मोहाडी आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील गावांना अत्यल्प पाणी मिळत आहे. तसेच गत काही वर्षात अपुरा पाऊस पडत असल्याने पेंच प्रकल्पात जलसाठाही पुरेसा होत नाही. त्यातच या प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखून ठेवले जाते. दिवसेंदिवस पेंच प्रकल्पाचा पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना वेळेवर पाणीच मिळत नाही. गत दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वेळेवर सिंचनासाठी पाणी मिळत नाही. कधी पाणी सोडले तर कालवा फुटून पाणी रस्त्यावर वाहून जाते. परिणामी शेतकºयांचे पीक करपून जाते.भंडारा तालुक्यातील ३४, मोहाडी तालुक्यातील १२ आणि मौदा तालुक्यातील २२ गावे या धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. धान आणि गव्हाची शेती केली जाते. परंतु पाणीच मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता या प्रकल्पाचे पाणी देण्याऐवजी भंडारा तालुक्यातील लोहारा किंवा पिंपरी चिंचोली येथे उपसा सिंचन योजना तयार करण्याची मागणी होत आहे. या गावांजवळ गोसे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात असते. तेथून उपसा सिंचन योजना राबवून खंडाळा-पिंपरी भंडाराकडे वाहणाºया जुन्या पेंच प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पाईपने पाणी सोडल्यास दुष्काळबाधीत गावांना दिलासा मिळू शकतो. याच गावाजवळून मौदा तालुक्यातील धरणगाव जवळ एका कंपनीला लागणारे पाणी उपसा करून पुरविले जाते. त्यामुळे शेतकºयांसाठी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी होत आहे. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गुंडेराव पाटेकर यांनी पुढाकार घेतला असून संबंधितांना निवेदन दिले आहे.
पेंचच्या पाण्याऐवजी उपसा सिंचन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:48 PM
सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : ७० गावांवर दुष्काळाचे कायम सावट