शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

देशाची मान खाली जाईल असे कृत्य करु नका

By admin | Published: December 03, 2015 12:46 AM

जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी.

कार्यशाळेचे आयोजन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे आवाहनभंडारा : जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी. देशाच्या विकासासाठी सर्व भेदभाव विसरुन एकता, अखंडता व बंधुत्वाचा विचार सर्वांपर्यंत रुजविण्याचे काम आपण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय भवनात झालेल्या या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे सदस्य प्रेमसागर गणविर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तीमत्व इतके बहुआयामी होते की, त्यांना समजून घ्यायला आपल्याला १०० वर्ष लागेल. देशातील सर्वात लांब असलेले हिराकुंड धरण बांधण्याची संकल्पना बाबासाहेबांची होती. सर्वांच्या कामाचे ८ तास असावे, पेन्शन फंड, प्रॅविडंट फंड, प्रसुती रजा, महिलांना संपत्तीमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेंबांनी काम केलं. जिथे-जिथे त्यांना अत्याचार, असमानता आणि विषमता दिसली त्यासाठी त्यांनी काम केले. बाबासाहेबांनी घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार व समान न्यायाची तरतूद केली आहे. तरीही अद्याप देशामध्ये ही समानता दिसत नाही आणि त्यासाठी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा करावा लागतो. अशा कायदयाची आपल्याला गरज पडणार नाही, अशी सर्वांची वर्तणूक असावी. तसेच या कायदयाचा गैरवापर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रेमसागर गणविर म्हणाले, जाती, धर्म, वंश या भितींच्या पलिकडे जावून आपल्या गावात एकता टिकून राहिल यासाठी सर्वांनी काम करावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाची सखोल माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून करुन घ्यावी आणि कायदयाची जनजागृती तळागाळापर्यंत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यशाळेत भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटिल सहभागी झाले होते. या कार्यशाळेत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत पोलिस विभागाद्वारे लावण्यात येणाऱ्या कलमांविषयी पोलिस निरिक्षक प्रशांत कोलवाडकर आणि प्राध्यापक पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले. कायद्याची माहिती वाडिभस्मे यांनी दिली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डि.एन. धारगावे यांनी संचालन विस्तार अधिकारी हुमने यांनी केले. (प्रतिनिधी)