शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर
2
'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं?
3
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
4
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
5
शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर
6
'बजरंगी भाईजान'मधली 'मुन्नी' आठवतेय? सध्या सोशल मीडियावर रंगलीये तिच्याच फोटोशूटची चर्चा
7
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
8
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
9
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
10
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
11
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
12
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
13
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
14
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
15
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
16
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
17
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
18
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
19
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
20
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'

वाईट घटनांचे मूक साक्षीदार होऊ नका

By admin | Published: September 11, 2015 12:59 AM

आपण ज्या समाजात जीवन जगतो त्या समाजात जीवन जगतो त्या समाजात काही वाईट प्रवृत्तीचे माणसेही आपल्यासोबत जीवन जगत असतात.

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर : पोलीस अधीक्षक झळके यांचे प्रतिपादनदिघोरी (मोठी) : आपण ज्या समाजात जीवन जगतो त्या समाजात जीवन जगतो त्या समाजात काही वाईट प्रवृत्तीचे माणसेही आपल्यासोबत जीवन जगत असतात. वाईट विचारांनी प्रेरीत झालेले नागरीक समाजात विविध प्रकारचे गुन्हे करीत असतात. अशा आपल्या समोर घडलेल्या गुन्ह्यांचा प्रतिकार करा किंवा पोलिसांपर्यंत संबंधित गुन्ह्यांची माहिती द्या. यामुळे समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत होईल. परंतु आजघडीला एक जबाबदार नागरीक या नात्याने गुन्ह्यांची माहिती देण्यास नागरिक समोर येत नाहीत. आपल्या समोर घडणाऱ्या वाईट घटनांचे मुक साक्षीदरा होऊ नका. कारण आज दुसऱ्यांवर वाईट प्रसंग ओढवला आहे. कदाचित उद्या आपल्यावरही वाईट प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळे समाजात घडणाऱ्या विविध वाईट घटनांचे मुक साक्षीदार बनू नका तर त्या घटनेला प्रतिकार करा, पोलिसांना माहिती द्या. यामुळे समाज व पोलीस एकमेकांचे चांगले मित्र म्हणून समोर येतील असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक झलके यांनी दिघोरी येथील मार्गदर्शन शिबिरात केले.महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर दिघोरी / मोठी येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक झलके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धरमसिंग व दिघोरीचे ठाणेदार बी.जे. यादव हे होते. स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर जि.प. ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी हुंडाबळी या विषयावर पथनाट्य सादर केले. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी स्वत:ला कुठेही कमी लेखू नये. समाजातील काही वाईट प्रवृतीचे नागरीक जर छेडछाड करीत असतील तर त्याचा मुकाबला धैर्याने करा. घाबरून जावू नका. पुढे बोलतांनी त्या म्हणाल्या महिलांना कायद्याने खूप मोठे संरक्षण पुरविले आहे. कलम ३५४, ३७३, ३०६, ३६३ इत्यादीविषयी संपूर्ण माहिती समाजवून सांगितले.सदर कायदेविषयक शिबिरात वर्ग १२ वी च्या विद्यार्थिनी, मुकुंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, गावातील व आसपासच्या महिला, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, आशा वर्कर, महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस ठाणे दिघोरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सोनपराते यांनी तर आभार गीताबाई बांगरे यांनी केले. (वार्ताहर)