लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बहुजनांच्या हितासाठी भारिप-बहुजन महासंघाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वांनी भारिप-बहुजन महासंघात सहभागी होऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन सत्तेत यायचे आहे. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या घराण्याशी बेईमान होऊ नका, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले.भारिप बहुजन महासंघ भंडारा जिल्हा अधिवेशन तथा राज्य कार्यकारिणीचा मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा अखिल भारती सभागृह भंडारा येथे पार पडला. त्याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते. अधिवेशनाचे उद्घाटन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रंजीत कोल्हटकर होते. यावेळी राज्य महासचिव कुशल मेश्राम, आमदार बळीराम शिरस्कार, माजी आमदार हरिभाऊ भेदे, युसूफ पूजानी, प्रा.सुरेश शेळके, भंडारा/गोंदिया जिल्हा निरीक्षक रोहिदास राउत उपस्थित होते. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा संघटक चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले. संचालन आशा शेंडे यांनी तर आभार जिल्हा महासचिव हरकलम ऊके यांनी मानले. मंचावर महिला अध्यक्ष कुंदा ऊके, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शाम भालेराव, युवा अध्यक्ष सुुधाकर धार्मिक उपस्थित होते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जनार्धन कोटांगले पवनी, अन्नवय गोस्वामी गणेशपूर, करन नंदेश्वर भंडारा, मंगलदास मेश्राम किरमटी यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यांंचे स्वागत महासचिव कुशल मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाकरिता उमराव डोंगरे, यादोराव गणवीर, शेखर सुखदेवे, दिगंबर मेश्राम, डॉ.भैयालाल गजभिये, जगजीवन हजारे, शांताराम खोब्रागडे, ताराचंद बारसागडे, नरेंद्र अंबादे, भारतभूषण वासनिक, अमित वैद्य, ध्यानदेव घरडे, भगवान शेंडे, विलास मेश्राम, नानाजी लोणारे, हर्षल मेश्राम, समिक्षक बोधप्रिय, भिमराव टेंभर्णे, हरिदास मेश्राम, ठगसेन घरडे, सुरेश रंगारी, संजय रंगारी, कमलेश बोरकर, शिवदास सोनपिंपळे, रणभीड मेश्राम, रमा रामटेके, आशा शेंडे आदींनी सहकार्य केले.
आंबेडकरी घराण्याशी बेईमान होऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:16 PM
बहुजनांच्या हितासाठी भारिप-बहुजन महासंघाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वांनी भारिप-बहुजन महासंघात सहभागी होऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
ठळक मुद्देअशोक सोनोने : भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा अधिवेशन