लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : स्थानिक पातळीवर होणारी ग्रामपंचायतची निवडणूक अटीतटीची असते. मताची जुळवाजुळव करताना आपसात मतभेद होतात. मतभेद गावाच्या विकासात अडथळा निर्माण करतात. गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता मतभेद विसरून गावकरी आणि ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित पदाधिकाºयांनी विकासाची कास धरायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार मधुकर कुकडे यांनी केले.सिलेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी घवघवीत विजय प्राप्त केला आहे. सरपंचपदी सध्या मुन्ना पारधी विजयी झाल्याने नवनिर्वाचित पदाधिकाºयांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मधुकर कुकडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, माजी जि.प. सदस्य विठ्ठलराव रहमतकर, सुरेश राहांगडाले, मोहगाव (खदान)चे नवनिर्वाचित सरपंच उमेश कटरे, मुन्ना पारधी, कल्याणी भुरे, पी.पी. गौतम, डॉ.माणिक राहांगडाले, रुपलाल गौतम, नेपाल गौतम, भाऊलाल राहांगडाले, भाउजी पारधी, फुलचंद येळे, शंकर देशकर, फुलचंद येडे, आमकर, सखाराम उपरिकार, प्रविण गौतम, लाला राहांडगाले, रमेश पारधी, युवराज राहांगडाले, यशवंत पडारे, विजय पवारे, रंजीत घटारे, भागवत राहांगडाले उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच संध्या मुन्ना पारधी व नवनिर्वाचित सदस्य सुखशाम येळे, जयप्रकाश पचारे, किरण पडारे, अशोक खरवडे, मनिषा राहांगडाले, कविता उपरीकार, सुनिता गजभिये, प्रियंका गुर्वे, कल्याणी शहारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात पंचफुला मेश्राम, हरिश्चंद्र कडव, तेजराम पेरे, माधोराव पडारे, सुभाष गुर्वे, प्रल्हाद राहांगडाले, सुभाष राहांगडाले, खेमराज शिंदे, हरी आमकर, गीता राहांगडाले, सहसराम नान्हे, मन्साराम मरठे उपस्थित होते. अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन सुखशाम गौतम यांनी केले तर आभार प्रदर्शन रत्नभोज पटले यांनी केले.
मतभेद विसरुन विकासाची कास धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:06 PM
स्थानिक पातळीवर होणारी ग्रामपंचायतची निवडणूक अटीतटीची असते. मताची जुळवाजुळव करताना आपसात मतभेद होतात.
ठळक मुद्देमधुकर कुकडे : सिलेगावात सत्कार समारंभ