पवनी बंदचे आवाहन : पटले यांचा इशारापवनी : पवनी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पाचही आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ रविवारला पवनी बंदचे आवाहन करण्यात आले असून यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.पवनी शहरामध्ये सामूहिक अत्याचाराची घटना घडली. एका अल्पवयीन मुलीवर अनेक दिवसापासून तिला ब्लॅकमेल करून सहा नराधमांनी गँगरेप केला व हा गँगरेप ब्लॅकमेलच्या माध्यमातून आणखी पुढे सुरूच राहिला असता. ब्लॅकमेल करणारी चित्रफिती बघितल्याने हा गँगरेप उघडकीस आला. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत पिडीत कुटूंबाची शिवसैनिकांनी भेट घेतली. या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पवनी शहर रविवारी बंद करण्याचे ठरविण्यात आले. या घटनेचा निषेध करून पिडीत कुटूंबाला न्याय मिळविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे नगराध्यक्षा रजनी मोटघरे, नरेश बावनकर, विजय काटेखाये, बाळू फुलबांधे, तुळशीराम वंजारी, जयंता मानापुरे, आनंद धांडे, राहुल बागडे, दिनेश पांडे, जगदिश त्रिभुवनकर, हिराताई मानापुरे, डॉ. संदीप खंगार, रामकृष्ण रामटेके, देवराज बावनकर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ पाचही आरोपींना कठोर शिक्षा द्या
By admin | Published: March 27, 2016 12:26 AM