मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मांढळ (दे) कुशारी मार्गावर वाट चुकलेले हरिणाचे एक गोंडस पाडस कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कुत्र्यांच्या टोळीने हरणाच्या कळपावर प्राणघातक हल्ला केला. इतर हरीण पळून गेले. त्यात गोंडस पाडस सापडला. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला त्या दिशेने दोन युवकांनी धाव घेतली. कुत्र्यांना पिटाळून लावून युवकांनी पाडसाला जीवनदान दिले.बुधवारी संध्याकाळी ६.३० दरम्यान आकाश गाढवे, कृष्णा खवास, पंकज झंझाड हे दोन युवक मांढळ - कुशारी मार्गावर फिरायला जात होते. त्यांना अचानक कुत्र्यांचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता, हरिणाचे एक कोवळे पाडस ज्यांचे वय अंदाजे साडेतीन महिन्यांचे असावे. ते जीवाच्या आकांताने धावताना व त्या कुत्र्यांच्या हल्ल्याला परतवताना आढळून आले. त्या दोघांनी तात्काळ धाव घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले. हरिणाच्या पाडसाला ताब्यात घेतले. कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडसाच्या डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाली होती. जखमी पाडसाला त्यांनी लगेच तुमसरच्या वनविभागाच्या कार्यालयात आणले. येथील कर्मचाºयांनी त्या पाडसावर प्रथमोपचार केले असून लवकरच त्याला जंगलात नेऊन सोडण्यात येणार आहे अशी माहिती वनकर्मचाºयांनी दिली.मांढळ (दे) शिवारातील शेतात भाजीपाला तथा रब्बी पिके घेतली जातात. पाणी व चराईकरिता हरणाचे कळप शेतशिवारात येथे नेहमीच येतात. वाट चुकून गावाच्या सीमेत व जवळ आल्यानंतर कुत्र्यांची टोळी हरीण व इतर जंगली प्राण्यांवर प्राणघातक हल्ला करतात. जबाबदार व प्राण्यांची दया करणाºया युवकांवर सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाचा जीव वाचविणाºया युवकांचे कौतूक केले जात आहे. तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त शिवारात मात्र शिकारी घटना मोठ्या प्रमाणात होते हे विशेष
हरणाच्या पिलावर कुत्र्यांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:49 PM
मांढळ (दे) कुशारी मार्गावर वाट चुकलेले हरिणाचे एक गोंडस पाडस कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कुत्र्यांच्या टोळीने हरणाच्या कळपावर प्राणघातक हल्ला केला.
ठळक मुद्देडाव्या डोळ्याला जखमा : तरुणांच्या सतर्कतेने जीवनदान