शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गोलेवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डोंगरगावात स्मशानभूमीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 1:04 PM

Bhandara : पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यविधी करताना गावकऱ्यांना करावा लागतो नानाविध संकटांचा सामना

अमोल ठवकरलोकमत न्यूज नेटवर्कपहेला : स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षांचा कालावधी लोटला तरी गावात शासनाच्या योजनांचा उपयोग होताना दिसत नाही. जवळच असलेल्या गोलेवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला डोंगरगाव येथील लोकसंख्या २५० च्या जवळपास आहे. या गावाला स्वतःची स्मशानभूमी नाही. त्यापैकीच एक गाव म्हणजेच डोंगरगाव. इथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला जागा शोधावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यविधी करताना नानाविध संकटांना समोर जावे लागत आहे.

इथे कविवर्य सुरेश भट्ट यांची कविता आठवतेय.. 'इतकेच मला सरणावर जाताना कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' डोंगरगाव हे गाव राज्यमार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. परंतु अद्याप स्मशानभूमीची जागा नाही. गोलेवाडी ग्रामपंचायतीतर्फे नियोजित सरकारी जागा गट क्रमांक सातची जागा नियोजित केली. परंतु या जागेकडे जाण्यासाठी मार्गच नाही.

आजूबाजूला शेतकऱ्यांचे शेत आहे. त्यामुळे डोंगरगाव नागरिक जिथे जमेल तिथे नाल्याच्या ठिकाणी अंत्यसंस्काराची विधी पार पाडतात. मागील दहा वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार हे डोंगरगाव आणि गोलेवाडी शिवारातील नाल्यावरच होत होते. परंतु याला गोलीवाडीतील नागरिकांनी विरोध दाखविला. शासनाकडे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाठपुरावा केला. मरणानंतरचा मार्ग खडतर असल्याचे गावकरी बोलून दाखवतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठेच अंत्यसंस्कारासाठी शेड नाही, पाणी नाही.

अंत्यविधीसाठी पाऊस उघडेपर्यंत वाट बघावी लागते. नाल्याच्या ठिकाणी जावे म्हटले तर एक किलोमीटरचे अंतर गाठावे लागते. त्या ठिकाणचा नाला हा उसळणी भरून वाहत असतो. डोंगरगाव गावालगत हक्काची जागा नसल्याने शासनाच्या दुर्लक्षितपणाचा कळसच म्हणावा लागेल. शासनाने या गावाला हक्काची स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून सोयी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी आहे.

"ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून तिथे येण्या-जाण्याचा मार्ग उपलब्ध करावा. तोपर्यंत किमान नाल्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सुविधा पुरवावी."- गुरुदेव चामट, माजी उपसरपंच, डोंगरगाव

टॅग्स :bhandara-acभंडारा