लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकी तसेच चारचाकी व अन्य वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याबाबतचे निर्देश केंद्र सरकारच्या रस्ते व परिवहन विभागाने सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सगळीकडेच सुरू आहे. परिणामी दादा, नाना, मामा अशा विशिष्ट नंबरची मागणी काहींशी घटली आहे.भंडारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने नवीन वाहन खरेदी केल्यानंतर तसेच जुन्या वाहनांची नाव नाेंदणी बदलताना वाहनांची तपासणी केली जाते. त्यानंतर आरसी बुक आणि अन्य कागदपत्रे दिली जातात. यात दुचाकी, चारचाकी तसेच खासगी वाहने यांच्या नंबर प्लेटवर यापूर्वी वेगवेगळ्या डिझाईन करून नंबर प्लेट टाकले जात हाेते. त्यात दादा, नाना, बाॅस यासह अन्य काही मजकूर टाकला जात हाेता.गत दाेन वर्षांपासून हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार वाहनांची तपासणी केली जाते. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविल्यामुळे त्यावर काेणत्याही विशिष्ट नंबर वेगळ्या पद्धतीने टाकता येत नाही. परिणामी नंबर प्लेट साध्या पद्धतीची बसवावी लागत असल्याने विशिष्ट नंबरची मागणी घटली आहे.यापूर्वी आवडीच्या नंबरसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नाेंदणी करण्याचे प्रमाण वाढले हाेते. आता हे प्रमाण दिवसागणिक कमी हाेत असल्याचे दिसून येत आहे.
हाय सिक्यूरिटी नंबर प्लेट म्हणजे काय रे भाऊ?सर्व साधारणपणे एकदा हाय सिक्यूरिटी नंबर प्लेट बसविली तर त्यावर सायरण जाेडलेला असताे. तसेच हाय सिक्यूरिटी नंबर प्लेटवर क्यूआर काेड टाकलेला असताे. त्यानुसार आरटीओ पथक तसेच वाहतूक शाखा आणि टाेल नाका येथे जीपीएस व अन्य स्कॅनरद्वारे हा नंबर स्कॅन केला जाताे. त्यामुळे ही नंबर प्लेट वेगळी व महत्वपूर्ण आहे.
या नंबरची क्रेझ कायमहाय सिक्यूरिटी नंबर आधी बसविली जाते. मग गाडीची सर्व कागदपत्रे तयार केल्यावर काहीजण ती बदलतात. अनेकजण ही नंबरप्लेट बसवितही नाही. त्यामुळे जुन्याच नंबर प्लेटवर विशिष्ट नंबर घेवून ताे टाकला जाताे. त्यामुळे नंबरची क्रेझ कायम आहे.
व्हीआयपीनंबरला लाखापर्यंत दरव्हीआयपीनंबरसाठी भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वर्षभरात एक ते दीड काेटी रुपयांचा महसूल जमा हाेताे. यात वेगवेगळ्या नंबरची मागणी केली जाते. दादा, मामा, नाना, बाॅस असे नंबर मिळविले जातात. तसेच सिरीज ताेडून नंबर मागितले जातात. त्यास वेगळी कर आकारणी केली जाते. साधारणपणे ५ हजारापासून एक लाखापर्यंत विशिष्ट नंबरला पैसे आकारले जातात.