इंद्रपाल कटकवार
भंडारा : ओटीपी किंवा संदेश आल्याचे सांगून तुम्हांला कुणी मोबाईल मागितला तर चुकूनही देऊ नका. दिल्यास क्षणातच बँक खात्यातील रक्कम गायब होऊ शकते. असे प्रकार महानगरात घडत असल्याने यापासून बोध घ्यायला हवा. अनोळखी व्यक्तींच्या हातात मोबाईल देताना काळजी घेण्यापेक्षा तो देऊच नये याची दक्षता घ्यावी.
आधुनिक जीवनशैलीत डिजिटल सेवेअंतर्गत ई कॉमर्सचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. त्वरित निधी हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत अनेकदा घोळ होत असतो. तुमच्या समोरील किंवा बाजूला उपस्थित असलेल्या व्यक्तींने तुमचा मोबाईल क्रमांक मागवून ओटीपी आल्याचे सांगितल्यास त्याला मोबाईल देऊ नका अन्यथा फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही.
बॉक्स
ही घ्या काळजी
कुठलीही बँक किंवा संस्था ग्राहकाची व्यक्तिगत माहिती मागवित नसते. विशेषत: पासवर्ड, सीव्हीसी कोड किंवा ओटीपीची कुठलीही गरज बँकेला राहत नाही.
कुठल्याही कारणाने कुणी अनोळखी व्यक्तीने मोबाईल मागितल्यास त्याला देऊ नका. याचवेळी त्याची विचारपूस करून तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करावे.
कुणीही व्यक्ती तुमच्या ताब्यातून जबरदस्ती मोबाईल घेऊ शकत नाही. अशा स्थितीत आरोपी विविध शक्कल लढवित असतात. याला कदापिही बळी न पडता सावधानता बाळगावी.
कोट
पोलीस अधिकारी म्हणतात
कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. सहजपणे कुणावरही विश्वास करून आपल्या जवळील मोबाईल देणे धोकादायक ठरू शकते. बँक खात्यातील रक्कम किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून व्यवहार सहजपणे केला जावू शकतो. त्यामुळे दक्षता बाळगणेच अत्यंत गरजेचे आहे.
- वसंत जाधव,
जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा