१६ लाेक १५ के बाॅटम
भंडारा : वाहने चालविताना प्रत्येकानेच वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. अति घाईघाईने वाहने चालवून स्वत:साेबत इतरांचा जीव धाेक्यात घालू नका, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी केले.
भंडारातील प्रगती महिला कला महाविद्यालय व वाहतूक नियंत्रण शाखा भंडाराच्या वतीने आयाेजित रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रबाेधनात्मक कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी कार्यक्रमासाठी पाेलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, पाेलीस अमलदार डाेईफाेडे, हलमारे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. डी. चाैधरी, प्रा. क्रिष्णा पासवान, डाॅ. जयश्री साताेकर, डाॅ. विजया लिमसे, डाॅ. कल्पना निंबार्ते, प्रा. शालिक राठाेड, डाॅ. गजानन कळंबे व अन्य मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी मार्गदर्शन करताना पाेलीस निरीक्षक कदम यांनी उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. डी. डी. चाैधरी अपघातापासून स्वत:चा बचाव करून इतरांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे आज काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून वाहतूक नियमांचे पालन व अपघातातून हाेणारी मनुष्याची जीवित हानी, आर्थिक हानी व त्याचे भविष्य कालीन जीवनावर हाेणारे गंभीर पडसाद व त्याचा दैनंदिन जीवनावर हाेणारा परिणाम यावर सखाेल मार्गदर्शन पाेलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे यांनी केले. सूत्रसंचालन क्रिष्णा पासवान यांनी केले, तर आभार शालिक राठाेड यांनी मानले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक पत्रकाचे वाटप करण्यात आले.